बहिणीशी अफेअरच्या रागातून भावाने काढला काटा; दांडेकर परिसरात बोलावून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 17:12 IST2024-10-15T17:12:36+5:302024-10-15T17:12:52+5:30

तरुणाने तुझ्या बहिणीला पळवून घेऊन जाईल, अशी धमकी दिली होती

The brother removed the thorn from the anger of the affair with the sister; A young man was killed by being called in Dandekar area | बहिणीशी अफेअरच्या रागातून भावाने काढला काटा; दांडेकर परिसरात बोलावून तरुणाचा खून

बहिणीशी अफेअरच्या रागातून भावाने काढला काटा; दांडेकर परिसरात बोलावून तरुणाचा खून

पुणे : बहिणीशी अफेअर असल्याच्या रागातून भावाने तिच्या मित्राचा काटा काढला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भावाने साथीदारांच्या मदतीने तरुणाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना दि. १४ ऑक्टोबरला संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास दांडेकर पूल परिसरात घडली. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कौस्तुभ जयदीप नाईक (वय २९, रा. सदाशिव पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पंकज नांगरे (वय ३१, रा. दांडेकर पूल) याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभचे आरोपीच्या बहिणीसोबत अफेअर होते. तुझ्या बहिणीला पळवून घेऊन जाईल, अशी धमकी त्याने दिली होती. त्याच रागातून आरोपीने साथीदारांना दांडेकर पूल परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी कौस्तुभला गाठून त्याला बेदम मारहाण केली. लाथा-बुक्क्यांसह काठीने मारहाण करून कौस्तुभचा खून केला. त्यानंतर टोळके पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: The brother removed the thorn from the anger of the affair with the sister; A young man was killed by being called in Dandekar area