शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार कोटी गुंतवणूक ब्लॉक

By admin | Updated: October 6, 2015 04:51 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कारभारावर नियंत्रण नसल्याने मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. नियोजनाचा अभाव आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण न झाल्याने

- विश्वास मोरे,  पिंपरीपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कारभारावर नियंत्रण नसल्याने मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. नियोजनाचा अभाव आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण न झाल्याने प्राधिकरण मूळ उद्देशापासून भरकटले आहे. संपादन करूनही विकसित न केल्याने सुमारे दोन हजार एकर जागा पडून आहे. शहरात घरांना प्रचंड मागणी असताना प्राधिकरणाकडे जागा असूनही प्रकल्प न उभारल्याने सुमारे दहा हजार कोटींची गुुंतवणूक ठप्प झाली आहे. सुनियोजित शहरासाठी नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली; मात्र गेल्या वीस वर्षांत एकाही गृहप्रकल्पाची निर्मिती झालेली नाही. रस्ते, उद्याने बनविणे या पलीकडे नगरनियोजनाबाबत कोणतीही ठोस धोरणे अवलंबलेली नाहीत. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसांच्या घराचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. प्रशासकीय मानसिकता नसल्याने गृहप्रकल्पांची निर्मिती झालेली नाही. गेल्या ८ वर्षांपासून भोसरी परिसरातील प्राधिकरणाचे अनेक प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राची २५० एकर, सेक्टर बारामधील गृहप्रकल्पासाठी १३२ एकर, याच भागातील अन्य क्षेत्र असे सुमारे चारशे एकर क्षेत्र पडून आहे. त्यावर ४० हजार घरांचे नियोजन प्राधिकरणास करता आले असते. त्यामुळे सुमारे १० हजार कोटींची उलाढाल, गुंतवणूक थांबली आहे. प्रशासक असूनही नाही विकास तेरा वर्षांमध्ये प्राधिकरणात प्रशासकीय राज आहे. लोकनियुक्त समिती नसल्याने प्राधिकरणाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त एस. चोक्मलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त राजीव जाधव विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. तसेच नगररचना संचालक दर्जाचा अधिकारी या संस्थेवर काम करतो. तीन आयएएस अधिकाऱ्यांचे वर्चस्व असूनही नियोजनबद्ध विकास झालेला नाही, हे ढळढळीत वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे विकासाची दृष्टी असणारे अधिकारी येणे गरजेचे आहे. (क्रमश:)