जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 17:39 IST2023-10-11T17:38:52+5:302023-10-11T17:39:18+5:30
मोरगाव रस्त्यावरून जेजुरीकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली

जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
जेजुरी: जेजुरी मोरगाव रस्त्यावर माऊली नगर येथील हॉटेल मेघ मल्हार समोर आयशर टेंपोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एका युवकाचा मृत्यू झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात राहुल अशोक पवार (वय ३० रा पवारवाडी,नाझरे क प, ता पुरंदर) या युवकाचा मृत्यू झाला तर सतीश खैरे हा युवक जखमी झाला आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल पवार व सतीश खैरे हे मंगळवार दिनांक १० रोजी ११ वाजण्याच्या सुमारास एका हॉटेल मध्ये जेवण करून मोरगाव रस्त्यावरून जेजुरी कडे निघाले होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकी गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात राहुल पवार हा युवक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला तर सतीश खैरे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस तपास करीत आहेत.