टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, इंदापुरातील विठ्ठलवाडीत अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:12 IST2017-10-01T13:01:05+5:302017-10-01T13:12:07+5:30
टेम्पोची धडक बसून दुसºया दुचाकीवर जावून आदळल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, इंदापुरातील विठ्ठलवाडीत अपघात
इंदापूर : टेम्पोची धडक बसून दुसºया दुचाकीवर जावून आदळल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ऐन दसºयाच्या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदापूर अकलूज रस्त्यावर विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली.
नवनाथ माणिक नलवडे (वय ३५, रा. नलवडेवस्ती, झगडेवाडी, ता. इंदापूर) असे मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. इस्माईल अजमुद्दीम शेख (रा. हनुमानवाडी, वडापुरी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिसांना या बाबत माहिती दिली.
ठाणे अंमलदार अरुण रासकर यांनी सांगितले, की खबर देणार शेख हे आपल्या मुलासह दुचाकीवरुन (क्र. एमएच ४२ सी १५७२) कामानिमित्त इंदापूरला निघाले होते. विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर इंदापूर कडून अकलूजच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस (क्र.एमएच ४२ एबी ८०९५) इंदापूर कडे निघालेल्या टेम्पोचा धक्का लागला. ती दुचाकी शेख यांच्या दुचाकीस धडकल्याने झालेल्या अपघातात त्या दुचाकीवरील नवनाथ नलवडे यांचा जागीच मृत्यू झाला. शेख यांच्या मुलाचा पाय मोडला.
अधिक तपास सहायक फौजदार दत्तात्रय जाधव करीत आहेत.