शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षक संघटनेचा पदाधिकारी व मुख्याध्यापक संभाजी शिरसाटला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 12:32 IST

बनावट मान्यतापत्राद्वारे वेतन देयक तयार करुन शासनाची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : शिक्षक संघटनेचा पदाधिकारी आणि मुख्याध्यापक संभाजी शिरसाट याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. खोट्या व बनावट वैयक्तिक मान्यता तयार करुन त्या खर्‍या असल्याचे भासवून त्या आधारे वेतन देयके तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात संभाजी शिरसाट याला अटक करण्यात आली आहे. 

याप्रकरणी भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक राजेंद्र बाबासाहेब साठे यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार संभाजी शिरसाट याच्यासह सुबोध शिक्षण संस्थेचे सचिव गौरव अशोक कदम, तात्कालीन वेतन पथक अधीक्षक भविष्य निर्वाह निधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून २०१६ ते सप्टेंबर २०१६ नंतर अद्यापपर्यंत घडला असल्याचे म्हटले आहे. आरोपींनी संगनमत करुन सुबोध शिक्षण संस्थेचे लिपिक व शिपाई यांच्या खोट्या व बनावट वैयक्तिक मान्यता तयार केल्या. त्या खर्‍या असल्याचे भासवून त्याआधारे वेतन देयके तयार करुन वेतन पथक प्राथमिक यांच्याकडे पाठवून वेतनापोटी एकूण १ लाख ४६ हजार ६०३ रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे. 

शिक्षक भरतीसाठी बनावट कागदपत्रे तयार करुन शिक्षणाधिकार्‍यांच्या संगनमताने बनावट भरती केल्याप्रकरणी आॅक्टोंबर २०१९ मध्ये बंडगृार्डन पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. त्यात २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दोन दिवसांपूर्वी ६ ठिकाणी छापे घालून काही कागदपत्रे व बनावट शिक्के जप्त केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर आता शिक्षण विभागातील विविध पथके कार्यन्वित झाली असून त्यातून शुक्रवारी रात्री अकरा वाजता समर्थ पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकArrestअटकPoliceपोलिसfraudधोकेबाजीGovernmentसरकार