वारजेत ट्रेलरच्या धडकेने शिक्षिकेचा मृत्यू; एकुलत्या एक मुलीचे आई-वडील दोघांचेही छत्र हरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 15:06 IST2024-05-18T15:06:18+5:302024-05-18T15:06:53+5:30

शिक्षिकेला एकुलती एक मुलगी असून त्यांच्या पतीचे एक वर्षापूर्वीच निधन झाले होते, मुलगी माता-पित्याच्या प्रेमाला पोरकी झाली

Teacher dies after being hit by a trailer in Waraje Both the parents of an only girl lost their umbrellas | वारजेत ट्रेलरच्या धडकेने शिक्षिकेचा मृत्यू; एकुलत्या एक मुलीचे आई-वडील दोघांचेही छत्र हरवले

वारजेत ट्रेलरच्या धडकेने शिक्षिकेचा मृत्यू; एकुलत्या एक मुलीचे आई-वडील दोघांचेही छत्र हरवले

शिवणे : कात्रजकडून चांदणी चौकाकडे येत असताना वारजेमधील महिंद्रा शोरूमसमोर ट्रेलरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने वर्षा किशोर घमंडी (वय ४६, रा. वारजे, माळवाडी) यांचा जागेवर मृत्यू झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका महिलेला जागेवर भोवळ आली होती.

वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा घमंडी या वारजे पुलावरून चांदणी चौकाच्या दिशेने आपल्या होंडा प्लेजर (एमएच १२ एलएम ४८५३) या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरचा (एमएच ४६ एएफ ८५८९) धक्का लागल्याने खाली पडल्या ट्रेलरचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून व पायावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

आई-वडील दोघांचेही छत्र हरवले 

वर्षा घमंडी या पेशाने शिक्षिका होत्या. एका कामानिमित्त त्या कात्रज भागात गेल्या होत्या, तेथून परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. दुर्दैव असे की घमंडी यांना कनिका नावाची एकुलती एक मुलगी असून त्यांच्या पतीचे एक वर्षापूर्वीच निधन झाले आहे. आई-वडील दोघांचेही छत्र हरविल्याने कनिका आता माता-पित्याच्या प्रेमाला पोरकी झाली आहे.

Web Title: Teacher dies after being hit by a trailer in Waraje Both the parents of an only girl lost their umbrellas