शिक्षकानेच केले विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 03:50 IST2018-10-30T03:49:20+5:302018-10-30T03:50:28+5:30

क्रीडा शिक्षकानेच स्कूल मधील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याने पालक वर्गांमध्ये खळबळ माजली आहे. 

The teacher did sexual abuse of students | शिक्षकानेच केले विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण

शिक्षकानेच केले विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण

हडपसर : सासवड रस्त्याच्या भेकराईनगर येथील लेक्सिकन इंग्लिश मिडियम स्कूलच्या क्रीडा शिक्षकांने चार विद्यार्थ्यांचे गेल्या १० महिन्यापासून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली हडपसर पोलिसांनी क्रीडा शिक्षकाविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

आनंद काळे (वय ४०), रा.काळेपडळ, हडपसर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. क्रीडा शिक्षकानेच स्कूल मधील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याने पालक वर्गांमध्ये खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी हडपसर भेकराईनगर येथील लेक्सिकन इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून असलेल्या आरोपीने स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गेल्या १० महिन्यापासून शाळेत व घरी नेऊन लैंगिक शोषण करत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. जानेवारीमध्ये एका मुलावर लैंगिक शोषण हा शिक्षक करीत होता. त्यांनतर अन्य मुलांशी हा शिक्षक तसेच वर्तन करू लागला. त्यानंतर सप्टेंबर मध्ये शाळेत हि मुले एकत्र आली. त्यावेळी त्यांच्यामध्ये याबाबत बोलणे झाले. त्यातील मुले आईवडिलांशी बोलायला घाबरत होती. मात्र एका स्थानिक मुलाने त्यांच्या पालकांशी मोठ्या धाडसाने ही घटना सांगितली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पालकांनी संताप व्यक्त करून शाळेत जाऊन गोंधळ घातला. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले.

स्कूलच्या प्रिन्सिपॉल ब्रिगेनजा कॅनडिस म्हणाल्या की विद्यार्थ्यांवर असा काही प्रकार झाल्याची तक्रार आमच्याकडे कोणत्याही पालकांनी दिली नाही. मात्र शिक्षकांनी असे गैरप्रकार केल्यामुळे संस्थेने संबंधित शिक्षकास निलंबित केले आहे.

Web Title: The teacher did sexual abuse of students