तावशीत भाजपाची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:11 IST2021-01-20T04:11:22+5:302021-01-20T04:11:22+5:30

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी चेअरमन अविनाश घोलप, माजी सभापती करणसिंह घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पुरस्कृत ...

Tawshit BJP's Sarshi | तावशीत भाजपाची सरशी

तावशीत भाजपाची सरशी

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी चेअरमन अविनाश घोलप, माजी सभापती करणसिंह घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पुरस्कृत श्री भैरवनाथ पॅनेलच्या माध्यमातून ११ पैकी ९ जागेवर विजय मिळावला असल्याचे सांगत गावातील बहुजन व सर्व ग्रामस्थांचे विजयी उमेदवारानी आभार मानले.

ग्रामपंचायत निकाल लागल्यानंतर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. यावेळी विजयी उमेदवार यांचे पाटील यांनी अभिनंदन केले.

भाजप पुरस्कृत श्री भैरवनाथ पॅनेल विजयी उमेदवार प्रभाग निहाय प्रभाग क्रमांक - १ राहुल नारायण व्होरकाटे, पुष्पा भानुदास खरात, चतुरा जयवंत धुमाळ प्रभाग क्रमांक २- रोहित दिलीप आवळे , संजय गणपत कांबळे.

प्रभाग क्रमांक -३ , चंद्रकांत आबासो सपकळ, सिंधू बाळासाहेब देवकाते , सुरेखा राजेश ओतेकर ( बिनविरोध )

प्रभाग क्रमांक ४, ज्ञानेश्वर नागू राऊत

राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ पॅनल विजयी उमेदवार प्रभाग क्रमांक २, चित्रलेखा अच्युत शिंदे

प्रभाग क्रमांक ४- वैशाली सूरज व्होरकाटे

--

फोटो क्रमांक: कुरवली तावशी ग्रामपंचायत

फोटो ओळ - माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपा विजयी उमेदवार यांचे अभिनंदन करताना.

Web Title: Tawshit BJP's Sarshi