वासुंदे परिसरातील टँकर आठवड्यापासून बंद

By Admin | Updated: June 6, 2015 22:12 IST2015-06-06T22:12:20+5:302015-06-06T22:12:20+5:30

वासुंदे (ता. दौंड) परिसरामध्ये जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय

The tanker in Vasunde area closed the week | वासुंदे परिसरातील टँकर आठवड्यापासून बंद

वासुंदे परिसरातील टँकर आठवड्यापासून बंद


वासुंदे : वासुंदे (ता. दौंड) परिसरामध्ये जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय स्तरावर टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर तब्बल दीड महिन्याने या गावासाठी शासकीय टँकर उपलब्ध झाला होता. मात्र, हा टँकरही आठवड्यापूर्वी अचानक बंद झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
प्रस्ताव दाखल केल्यानंतर शासकीय स्तरावर झालेल्या दिरंगाईमुळे शासकीय टँकर उपलब्ध होण्यात अनेक अडचणी आल्या. त्यानंतर दि.१३ मे रोजी या गावात शासकीय टँकर दाखल झाला. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येपासून जनतेला दिलासा मिळाला. मात्र, सुरळीतपणे सुरु असलेला हा टँकर अचानक नाट्यमयरित्या बंद झाल्याने पुन्हा नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, जो टँकर वासुंदे गावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आला होता, त्या टँकरला लेखी आदेश नसल्याचे समजते. केवळ शासकीय स्तरावरील तोंडी आदेशानुसार हा टँकर या ठिकाणी आला होता. मात्र, सुरु असलेला सदरचा टँकर अचानकपणे या ठिकाणाहून दुसऱ्या तालुक्यामध्ये पाठवल्याने सुरळीत चालू असलेला पाणीपुरवठा बंद पडला आहे.

Web Title: The tanker in Vasunde area closed the week