शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

टँकरला जीपीएस, पण नियंत्रणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2015 04:30 IST

शहरातील पाण्याच्या टँकरचालकांकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व टँकरना ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम (जीपीएस) बसवून घेतली.

पुणे : शहरातील पाण्याच्या टँकरचालकांकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व टँकरना ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम (जीपीएस) बसवून घेतली. मात्र, प्रत्यक्षात या टँकरवर नियंत्रण ठेवण्यासाठीची यंत्रणाच उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन पाणीटंचाई काळातही टँकरचालकांकडून होत असलेल्या गैरप्रकारांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.शहरामध्ये महापालिकेकडून टँकरचालकांना पाणी उपलब्ध करून दिले जाते. कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकर पुरविले जातात. मात्र, टँकरचालकांकडून बांधकाम व्यावसायिकांना टँकर विकणे, हद्दीबाहेर नेऊन पाण्याची विक्री करणे असे प्रकार घडत असल्याचे वारंवार उजेडात आले होते. यावर मार्ग काढण्यासाठी सर्व टँकरना जीपीएस बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मे २०१५ पर्यंत महापालिकेच्या व खासगी ठेकेदारांच्या सर्व टँकरना जीपीएस यंत्रणा बसविली गेली आहे. टँकरला आखून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त तो दुसऱ्या ठिकाणी गेल्यास जीपीएसद्वारे त्याची माहिती लगेच नियंत्रण कक्षाला मिळेल, अशी त्यामागची व्यवस्था होती. मात्र, प्रत्यक्षात त्याकरिता मॉनिटरिंग व्यवस्थाच न उभारल्याने जीपीएस उभारूनही टँकरचालकांकडून होत असलेल्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे टँकरचालकांचे चांगलेच फावत आहे. शहरात सात ठिकाणी महापालिकेची टँकर भरून देण्याची व्यवस्था आहे. जीपीएस बसविण्याचे परिपत्रक २०१२ मध्ये प्रशासनाने काढले. त्यानंतर मे २०१३ मध्ये याला मुख्य सभेने मान्यता दिली. त्यालाही टँकरचालकांच्या लॉबीकडून विरोध झाल्याने अनेक दिवस हा प्रस्ताव रेंगाळला होता. अखेर मे २०१५ मध्ये सर्व टँकरला जीपीएस बसले आहेत. महापालिकेचे ५० व खासगी व्यावसायिकांचे १५० असे २०० पाण्याचे टँकर पुण्यात आलेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने आॅगस्ट महिन्यात टँकरच्या १४ हजार १६७ फेऱ्या झाल्या आहेत. वस्तुत: दर वर्षी पावसाळ्यामध्ये टॅँकरची संख्या घटत असते. यंदा त्यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या १२ हजार ५८६ इतकी होती.