शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

पावसाळा सुरु होताच ‘स्वीटकॉर्न’ ची मागणी वाढली..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 4:00 PM

पावसाळा सुरु होताच पावसाचा, धबधबे पाहण्यासाठी निसर्गाच्या हिरवळीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडतात.

ठळक मुद्देपावसाळा सुरु होताच ‘स्वीटकॉर्न’ ची मागणी वाढलीमागणी वाढल्याने दरामध्ये देखील १० ते २० टक्क्यांनी वाढ 

पुणे : पावसाळ्यामध्ये पर्यटन स्थळी ओले चिंब भिजले असताना आपलं लक्ष वेधून घेते ते गरम वाफेवर भाजले जाणारे मक्याची कणसं..! भिजलेल्या शरीराला आवश्यक ती ऊबदारपणा देण्याचं काम ही मक्याची कणीस करतात..पुण्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पर्यटनस्थळी या स्वीट कॉर्नची मागणी वाढू लागली आहे.

पावसात चिंब भिजल्यामुळे शरीराला कुठेतरी ऊबदार खाद्यपदार्थांचे डोहाळे लागतात.. त्यात गरमागरम भजी, वडापाव, उकडलेल्या भुईमुंगाच्या शेंगा, पराठे, आणि स्वीटकॉर्न...! ह्या स्वीटकॉर्नचं महत्व तसं पावसाळ्यात दुर्लक्षित करण्याजोगं नक्कीच नाही.विस्तवाच्या शेगडीवर भाजलेले मक्याचे कणीस लोकांना आकर्षित करतात.

मक्याचे कणीस आयुर्वेदात पण महत्वाचे सांगितले आहे. स्वीटकॉर्नची चटकदार भेळ ही जिभेला सुखावह अनुभव देणारी ठरते. 

पावसाळा सुरु होताच पावसाचा, धबधबे पाहण्यासाठी निसर्गाच्या हिरवळीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडतात. यामुळेच पावसाळा सुरु होताच ‘स्वीटकॉर्नची मागणी वाढू लागली असून, यामुळे दरामध्ये देखील १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.     संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पर्यटकांचे डोळे पावसाकडे लागले होते. परंतु गेल्या तीन चार दिवसांपासून संपूर्ण पुणे शहरासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मध्ये पुणे शहरालगत आणि जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पर्याटककांची प्रचंड गर्दी होते. यामध्ये खडकवासल्यापासून ते सिंहगडापर्यंत तर सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची तुडुब गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेत लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून स्वीटकॉर्नची विक्री केली जाते. यामुळेच गेल्या आठ दिवसांपासून येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये स्वीटकॉर्नची मागणी वाढली आहे.  गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवार (दि.३०) रोजी सुमारे दोन हजार पोती मक्याच्या कणसाची आवक झाली. घाऊकबाजारात १० ते १३ रुपये असा प्रतिकिलोसाठी दर होता. सध्या खेड, मंचर नारायणगाव, बारामती, नाशिक या भागातून कणसाची आवक होत आहे. शहरात सध्या संततधार पावसाला काही दिवसांपासून सुरुवात झाली. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनासाठी पुणेकर घराबाहेर पडू लागले आहे. ठिकठिकाणी मक्याच्या कणसाच्या विक्रेत्यांनी भाजलेली कणसे विकायला ठेवल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पर्यटन ठिकाणी स्वीटकॉर्न, भाजलेल्या कणसांना मागणी वाढली आहे.    मक्याच्या कणसाला मागणी वाढल्याने बाजारात, तसेच किरकोळ ग्राहकांकडून मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. येत्या आठवड्यात त्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत. पुणे शहराबरोबर जिल्ह्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडला, तर त्याला आणखी मागणी वाढेल. किरकोळ बाजारात सध्या भाजलेल्या कणसाला २० ते २५ रुपये द्यावे लागत आहेत. पर्यटनस्थळी विक्रेत्यांकडून मक्याच्या कणसाची मोठी विक्री होते. ग्राहकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांची चांदी होत आहे. एका कणसाला अपेक्षेपेक्षा अधिक भाव आकारला जात असल्याचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस