स्वारगेट प्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:43 IST2025-03-12T11:40:35+5:302025-03-12T11:43:24+5:30
न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पीडितेचा पोलिस आयुक्तांकडे विनंती अर्ज

स्वारगेट प्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करा
पुणे : स्वारगेट येथील बसस्थानकावर माझ्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयात माझी बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. असीम सरोदे यांची नियुक्ती करावी, असा विनंती अर्ज पीडित तरुणीने पोलिस आयुक्तांकडे केला आहे.
स्वारगेट बसस्थानकात दि. २५ फेब्रुवारी रोजी शिवशाही बसमध्ये दत्ता गाडे नावाच्या व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला. ही घटना समजून घेण्यात बहुसंख्य लोकांनी असंवेदनशीलता दाखविली. तेव्हा ॲड. असीम सरोदे यांनी माझ्यावरील अन्याय संवेदनशीलतेने समजून घेतला. त्यांच्या कार्यालयातील सगळ्यांनी मला आधार दिला.
त्यांच्या सहकारी ॲड. श्रीया आवळे यांच्याकडे मी माझे मन मोकळे केले. ते मला न्याय मिळवून देतील याची मला खात्री आहे. त्यामुळे माझी केस चालविण्यासाठी ॲड. सराेदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, अशी विनंती असल्याचे पीडित तरुणीने अर्जात नमूद केले आहे.