शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

निलंबित नगररचना सहसंचालक हनमुंत नाझीरकर यांच्या भाच्याचा जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 11:55 AM

जामीन मिळावा असा अर्ज भाचा राहुल खोमणे याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता

ठळक मुद्देलाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हनुमंत नाझीरकर याच्यासह ८ जणांविरुद्ध नुकतेच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे

पुणे: गेले १०० हून दिवस येरवडा कारागृहात असलेल्या निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर याचा भाचा राहुल खोमणे याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हनुमंत नाझीरकर याच्यासह ८ जणांविरुद्ध नुकतेच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यात त्यांनी ८२ कोटी रुपयांची अपसंपदा बाळगल्याचा आरोप आहे. हे दोषारोपपत्र ९१ व्या दिवशी सादर केल्याने आपल्याला जामीन मिळावा, असा अर्ज राहुल खोमणे याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे यांनी त्याबाबत न्यायालयात यापूर्वी उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाड्याचा उल्लेख नमूद करुन हा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली.

सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सांगितले की, राहुल शिवाजी खोमणे (वय ३१, रा. शिरवली, ता. बारामती) याला २४ मार्च रोजी अटक करुन २५ मार्च रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने प्रथम १ एप्रिल व नंतर ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. ७ एप्रिलपासून आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्यावर २४ जून रोजी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. खोमणे हा मार्चचे ७ दिवस एप्रिलचे २९ दिवस, मे ३१ दिवस व  आरोपीने २३ जून रोजी जामीनासाठी (डिफॉल्ट बेल) अर्ज केला आहे. जूनचे २३ दिवस अशी गणना करता आरोपीने ९० दिवस पूर्ण न होताच मूदतपूर्व अर्ज केलेला आहे.

यश पाल गुप्ता विरुद्ध पंजाब सरकार व इतर या केसमधील उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे आरोपीवर ९१ व्या दिवशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरुन जामीन अर्ज फेटाळला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या अपसंपदा खटला आहे. त्याचबरोबर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या गुन्ह्यात इतका काळ न्यायालयीन कोठडीत असलेला हा बहुदा पहिलाच गुन्हा आहे.  या जामीन अर्जावरील सुनावणीला न्यायालयात मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटकadvocateवकिल