शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक रेल्वेच्या सर्वेक्षणाला सुरुवात

By admin | Updated: March 23, 2017 04:04 IST

अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. हा रेल्वेमार्ग पुणे-नाशिक महामार्गाच्या पूर्व दिशेऐवजी

राजगुरुनगर : अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. हा रेल्वेमार्ग पुणे-नाशिक महामार्गाच्या पूर्व दिशेऐवजी पश्चिमेकडून निश्चित झाला आहे. पश्चिमेकडून घेतल्यामुळे प्रस्तावित २६५पैकी ५६ किलोमीटर अंतर वाचणार आहे.गेल्या वर्षी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी देऊन अर्थसंकल्पात १२१२ कोटींची तरतूद केल्यामुळे हा रेल्वेमार्ग होणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार २६५ किलोमीटरचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये पुणे स्थानक ते राजगुरुनगर व पूर्वेकडे पाबळ, निरगुडसर असा आराखडा तयार केला होता. परंतु महामार्गाच्या पश्चिमेकडून केलेल्या सर्वेक्षणामुळे रेल्वेमार्गाचे अंतर ५६ किलोमीटर कमी होऊन २०९ किलोमीटर होणार आहे. त्यामुळे खर्चात व वेळेतही बचत होणार आहे. पश्चिमेकडून जाणाऱ्या या रेल्वेमार्गात तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर, नाशिक रोड या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. या मार्गावर एकूण २५ स्थानके असून, त्यामध्ये जुन्या दहा स्थानकांचा समावेश आहे. या महामार्गामुळे पुणे-नगर-नाशिक हे तीन जिल्हे जोडले जाणार असून, चाकण, संगमनेर, सिन्नर व नाशिक या औद्योगिक वसाहतींनाही फायदा होणार आहे. खेडच्या पश्चिमेला सातकरस्थळ हद्दीमधून हा रेल्वेमार्ग जाणार असून, तेथेच रेल्वेस्थानकही होण्याची शक्यता आहे.