शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

ऊस वाहतूकदार आक्रमक

By admin | Updated: August 6, 2015 03:45 IST

साखर कारखानदारीवरील विघ्न संपण्याचे काही नाव घेत नाही. आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ट्रक व ट्रॅक्टर ऊस वाहतूकदार आता आक्रमक

सोमेश्वरनगर : साखर कारखानदारीवरील विघ्न संपण्याचे काही नाव घेत नाही. आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ट्रक व ट्रॅक्टर ऊस वाहतूकदार आता आक्रमक झाले असून, जोपर्यंत आमचे गेल्या हंगामातील कमिशन व डिपॉझिट मिळत नाही, तोपर्यंत कारखान्याबरोबर एकही करार करणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. येथील सोमेश्वर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना आता सन २०१४—१५ हंगामातील कमिशन व डिपॉझिट तसेच बँकेचे कर्जमुक्तीचे दाखले द्या; अन्यथा येणाऱ्या हंगामासाठी एकाही वाहनाचा करार करणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. येणाऱ्या हंगामातील करारासाठी वाहनांना उचल न देता २५ हजार रुपये डिपॉझिट देण्याची अट आम्हाला मान्य नसल्याचे संघटनेने सांगितले आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मीटिंगमध्ये ३०० ते ३५० ट्रक व ट्रॅक्टर वाहनमालक उपस्थित होते. या वेळी बाळासाहेब परकाळे उपस्थित होते. कारखाना प्रशासनाच्या वतीने शेतकी अधिकारी सोमेनाथ बेलपत्रे यांनी ३५० सह्यांचे निवेदन स्वीकारले. संघटनेने कारखान्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आमचे ट्रक व ट्रॅक्टर मालकांचे कारखान्याकडे असलेले कमिशन व डिपॉझिट दोन दिवसांत द्यावे. तसेच हंगाम २०१३-१४ व १४-१५ या काळातील आम्ही कारखान्याकडून घेतलेले कर्ज फेडले असतानाही बँकेत आमच्या नावे कर्ज दिसत आहे. त्याचा कर्ज बाकी नसल्याचा दाखला मिळावा. आमच्या नावे कर्ज दिसत असल्याने इतर कोणत्याही बँका आम्हाला कर्ज देण्यास धजावत नाहीत तरी वरील सर्व दोन दिवसांत द्यावे; अन्यथा एकही ट्रक व ट्रॅक्टरमालक येणाऱ्या हंगामात कारखान्याशी करार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)