चालत्या दुचाकीचा अचानक स्फोट; वडील अन् लहान मुलगा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 12:13 IST2021-06-10T12:10:25+5:302021-06-10T12:13:32+5:30

राजगुरूनगर शहरातील अहिल्यादेवी चौक येथे खंडोबा मंदिराजवळ घडलेल्या घटनेने एकच खळबळ

Suddenly blast of a runing bike; Father and son injured | चालत्या दुचाकीचा अचानक स्फोट; वडील अन् लहान मुलगा गंभीर जखमी

चालत्या दुचाकीचा अचानक स्फोट; वडील अन् लहान मुलगा गंभीर जखमी

राजगुरुनगर: चालत्या नवीन दुचाकीचा अचानक स्फोट होऊन चालक असलेले वडील आणि पुढे बसलेला लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना राजगुरूनगर येथे गुरुवारी (दि १०) सकाळी घडली.

शहरातील अहिल्यादेवी चौक येथे खंडोबा मंदिराजवळ घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. संतोष शेवाळे हे दुचाकीवरून प्यायला पाणी आणायला निघाल्याचे समजते.लहान मुलाला पुढे बसवुन घरापासून काही अंतर गेल्यावर मोठा आवाज होऊन हा स्फोट झाला. यात दुचाकीचे सीट व त्याखालील भाग फाटला.त्या स्फोटात चालक शेवाळे यांचे कंबरेखाली दोन्ही पाय फाटून रक्तबंबाळ झाले. तर लहान मुलाच्या पायाला सुद्धा मोठ्या जखमा झाल्या. मात्र अशा प्रकारच्या दुचाकीच्या अचानक स्फोट होण्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्फोटानंतर या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Web Title: Suddenly blast of a runing bike; Father and son injured