पुणे जिल्ह्यातील उपबाजार सुरू ; गुलटेकडीचा मुख्य बाजार कधी सुरू होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:02 PM2020-04-15T18:02:39+5:302020-04-15T18:04:31+5:30

ठराविक काळासाठी व सोशल डिस्टन्सिंगच्या अटींवर बाजार सुरू

Sub-market started in Pune district; When will the main market for Gultekadi begin? | पुणे जिल्ह्यातील उपबाजार सुरू ; गुलटेकडीचा मुख्य बाजार कधी सुरू होणार 

पुणे जिल्ह्यातील उपबाजार सुरू ; गुलटेकडीचा मुख्य बाजार कधी सुरू होणार 

Next
ठळक मुद्देपुण्यातील मुख्य बाजार कधी सुरू होणार असा सवाल उपस्थितगुलटेकडी येथील मुख्य बाजार आवारातील फळे, भाजीपाला आणि कांदा व बटाटा विभाग बंद

पुणे: पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे गेल्या पाच दिवसांपासून गुलटेकडी येथील मुख्य बाजार आवारातील फळे, भाजीपाला आणि कांदा व बटाटा विभाग बंद आहेत. यामुळे शहरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत असून. काही प्रमाणात उपलब्ध होणारा शेतीमाल प्रचंड चढ्या दराने खरेदी करावा लागत आहे. याबाबत पोलिस, जिल्हा प्रशासन व बाजार समिती प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत शहरालगतचे उपबाजार काही ठराविक कालावधीत व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मोशी व मांजरी येथील उपबाजार सुरू देखील करण्यात आले आहेत.परंतु पुण्यातील मुख्य बाजार कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरातील नागरिकांन सोबतच शेतात माल सडून चाललेल्या शेतक-यांना गुलटेकडीचा बाजार सुरु होण्याची प्रतिक्षा आहे. 
पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने बहुतेक निम्मे शहर सील करण्यात आले आहे. यामध्ये गुलटेकडी व मार्केट यार्ड परिसराचा देखील समावेश आहे. यात मार्केट यार्डा परिसरालगत असलेल्या झोपडपट्टीत दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. यामुळे व्यापारी, आतडे, हमाल सर्वच लोकांमधे प्रचंड धास्तीचे वातावरण आहे. यामुळे जिल्हा प्रशासनानेच गुलटेकडी येथील मुख्य बाजार आवारातील फळे, भाजीपाला व कांदा व बटाटा विभाग अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु यामुळे शहरामध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊन नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे.
मुंबई बाजार समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर पुण्यातील बाजार देखील सुरू करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यात सुरूवातीला शहरालगतचे उपबाजार काही ठराविक कालावधीत व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सुरू करण्यात आल्या असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी जे देशमुख यांनी स्पष्ट केले.
------ 
प्रशासनाने सांगितले तर बाजार सुरू करू..
पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेच गुलटेकडी येथील मुख्य बाजार आवार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रशासनाने सांगितल्यास पुन्हा बाजार आवार सुरू करण्यास आडत्यांची काही हरकत नाही. 
-विलास भुजबळ, अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन

Web Title: Sub-market started in Pune district; When will the main market for Gultekadi begin?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.