पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Published: February 23, 2024 02:54 PM2024-02-23T14:54:48+5:302024-02-23T14:55:30+5:30

पैसे परत करण्यास उशीर केल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती

Struggling to return the money the young man took the extreme step A case has been registered against three | पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: घर खरेदीसाठी उसने घेतलेले पैसे परत न केल्याने शिवीगाळ करून त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडी भागात घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आजिनाथ सर्जेराव लोखंडे (४२, रा. तळजाई पठार, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. लोखंडे यांना धमकावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामदास काशिनाथ त्र्यंबके (रा. बाभळगाव, ता. माढा, जि. सोलापूर), व्यास गुलाब यादव (रा. जांभुळवाडी, आंबेगाव, कात्रज) आणि मयूर विलास साळुंखे (रा. पंचवटी सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजिनाथ याची पत्नी सारिका आजिनाथ लोखंडे (३८) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अजिनाथ लोखंडे यांचा भंगार माल खरेदी व्यवसाय आहे. पर्वती येथे घर घेण्यासाठी आरोपींकडून ७ लाख रुपये उसने पैसे घेतले होते. लोखंडेने पैसे परत करण्यास उशीर केल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपींनी दिलेल्या धमक्यांमुळे लोखंडे तणावाखाली होते, त्या तणावातून त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लोखंडे यांची पत्नी सारिका यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे करत आहेत.

Web Title: Struggling to return the money the young man took the extreme step A case has been registered against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.