शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पावसाचे जोरदार पुनरागमन

By admin | Updated: October 3, 2015 01:52 IST

उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांनाशुक्रवारी जोरदार पावसाने दिलासादिला. गुरूवारी हलका बरसल्यानंतर आज दुपारनंतर पावसाने जोरदार पुर्नरागमन केले आणि पुणेकरांना सुखावले

पुणे : उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांनाशुक्रवारी जोरदार पावसाने दिलासादिला. गुरूवारी हलका बरसल्यानंतर आज दुपारनंतर पावसाने जोरदार पुर्नरागमन केले आणि पुणेकरांना सुखावले. रात्रीसाडेआठपर्यंत २४ मिमी पाऊस पडल्याची नोंद पुणे वेधशाळेत झाली. शहरात सगळीकडे पावसाला जोर होता. त्यामुळे ठिक-ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. पावसाचा परिणाम वाहतूकीवरही झाला. सायंकाळी प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक मंदावली होती. काही चौकांमधील सिग्नल बंद पडल्याने तेथे वाहतूक कोंडीही झाली होती.गुरूवारी हलक्या पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पाऊस गायब होऊन वातावरण ढगाळ झाल्याने उकाडा अधिकच वाढला होता. आज सकाळी आकाश निरभ्र असल्याने लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. त्यामुळे पाऊस येईल, असे वाटत नव्हते. मात्र दुपारी बाराच्या सुमारास आकाशात अचाकनपणे काळे ढग दाटून आले आणि पावसास सुरूवात झाली.सुरूवातीला उपनगरांमध्ये सुरू झालेला पाऊस काही वेळातच शहरातही आला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसास सुरूवात झाली. पावसाचा जोर इतका होता काही काही मिनिटांमध्येच रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहू लागले आणि रस्त्यांना ओढयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तासभर बरसल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. पावसाच्या शिडकाव्यानंतर हवेत गारवा निर्माण झाला आणि उकाडयाने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. गुरूवारी ३४ अंशावर गेलेला पारा पावसामुळे शुक्रवारी ३२. १ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. पावसाच्या जोरदार धारांमुळे अल्पावधीत रस्त्यावर तळे साचले. अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. सायंकाळीही पावसाची रिपरिप सुरू असल्याने त्याचा परिणाम वाहतूकीवर झाला. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. लॉ कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, कर्वे रस्ता आदी रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होता.