रिंगरोडसाठी जमीन देण्याचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:11 IST2021-03-21T04:11:24+5:302021-03-21T04:11:24+5:30

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे वरीष्ठ पदाधिकारी शामसुंदर जायगुडे, महेश कोंडे, केळवडेचे माजी सरपंच शांताराम जायगुडे, जितेंद्र कोंडे, दिपक भडाळे, ...

Strong opposition to giving land for ringroad | रिंगरोडसाठी जमीन देण्याचा तीव्र विरोध

रिंगरोडसाठी जमीन देण्याचा तीव्र विरोध

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे वरीष्ठ पदाधिकारी शामसुंदर जायगुडे, महेश कोंडे, केळवडेचे माजी सरपंच शांताराम जायगुडे, जितेंद्र कोंडे, दिपक भडाळे, बाळासाहेब धुमाळ, राजेंद्र कोंडे, मोहन धुमाळ, बाळा आण्णा कोंडे,शंकर कोंडे, प्रदीप कोंडे,धनाजी धुमाळ, भाऊसाहेब जाधव,हरी कामठे आदी मान्यवर शेतकरी उपस्थित होते.

पश्चिम भागातील केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव, रांझे तर हवेली तालुक्यातील रहाटवडे, कल्याण, मोरदरी, घेरा सिंहगड या गावात प्रामुख्याने बागायती शेत जमिनी आहेत.या पट्ट्यातील शेतकऱ्यांना या रस्त्यासंदर्भात शासन अधिकारी माहिती लपवीत असून कुठलीच माहिती अधिकारी देतच नाहीत त्यामूळे शेतकरी संभ्रमात आहेत.शेत जमीन जर रिंग रोड मध्ये गेल्यास आम्ही रस्त्यावर येऊन अनेक शेतकरी भूमीहीन होतील त्यामुळे शासनाने या प्रस्तावित भागातून जाणाऱ्या रींगरोड ला स्थगिती द्यावी.

या पश्चिम पट्यातील शेतकर्यांचा रस्त्याला तीव्र विरोध आहे आणि राहीलच. हा रस्ता शेतकरी हिताचा नसून शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. शासनाने विचार करूनच निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा बाधित शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आला.

अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या काही अडचणी आल्या त्याप्रमाणे संबंधित गावच्या सुनावण्या सुरू केल्या असून केळवडे गावाची हरकत आल्यास येत्या सोमवारी सुनावणी होईल.

राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी भोर

केळवडे (ता.भोर) येथे बागायती जमिनीतून रिंगरोड होऊ द्यायचाच नाही असा येथील शेतकऱ्यांनी सामुहीक निर्णय घेतला त्याप्रसंगी कुलदीप कोंडे, शामसुंदर जायगुडे आदी मान्यवर शेतकरी.

Web Title: Strong opposition to giving land for ringroad