शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मंचरमध्ये तणाव, वरवंड येथे लाठीचार्ज

By admin | Updated: August 5, 2015 03:32 IST

मतदान करण्यावरून होणारी बाचाबाची, विरोधक समोरासमोर आल्याने त्यांच्यात झालेली भांडणे, त्यामुळे काही ठिकाणी निर्माण झालेला तणाव

पुणे : मतदान करण्यावरून होणारी बाचाबाची, विरोधक समोरासमोर आल्याने त्यांच्यात झालेली भांडणे, त्यामुळे काही ठिकाणी निर्माण झालेला तणाव, पण पोलिसांनी त्यात तातडीने हस्तक्षेप करीत केलेली कारवाई यामुळे मावळमधील घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले़ अनेक तालुक्यांत मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे दिसून येत होते़ जिल्ह्यात सरासरी ८२ टक्क्यांच्या वर मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे़ दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ७३ टक्के मतदान झाले होते़ जिल्ह्यातील जुन्नर, वेल्हा, घोडेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांतील दुर्गम भागात सकाळपासूनच मतदानाला उत्साह दिसून आला़ अनेक ठिकाणी मतदान सुरूझाल्याबरोबर रांगा लागल्याचे चित्र दिसत होते़ त्यामानाने मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झालेल्या गावांमध्ये उत्साह कमी दिसून आला़ मंचर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खासदार आणि आमदारांनी आपली शक्ती पणाला लावल्याने येथे अधिक चुरस दिसून येत होती़ त्यामुळे काही मतदान केंद्रांवर तणाव निर्माण झाला होता़ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती निवळली़ मतदान सुरू झाल्यानंतर सर्वत्रच उत्साह दिसून आला़ सकाळी मतदानाचा वेग चांगला होता़ अनेक ठिकाणी दुपारी १२ पर्यंतच ५० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते़ दुपारनंतर हा वेग मंदावला़ सायंकाळी मात्र, त्यात पुन्हा वाढ झाली़ बारामती तालुक्यात साधारण ८८ टक्के मतदान झाले असून, पश्चिम भागात सकाळपासूनच रांगा लागल्याचे दिसत होते़ अनेक ठिकाणी दोन पॅनलमध्ये चुरस दिसून आली़ इंदापूरला शांततेत मतदान पार पडले़ अनेक ठिकाणी मतदारांना ने-आण करण्यासाठी आलिशान गाड्यांची सोय केल्याचे दिसून येत होते़ इंदापूराच्या पश्चिम पट्ट्यात तुलनेने मतदानाचा वेग अधिक होता़ अनेक ग्रामपंचायतींत ९० टक्क्यांपर्यंत मतदान झाले़ हगारेवाडीत ९२ टक्के मतदान झाले, तर वालचंदनगरमध्ये सर्वांत कमी ६२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला़ वेल्हा तालुक्यात सरासरी ८५ टक्के मतदान झाले असून, अनेक ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीने नव्वदी पार केल्याचे दिसून आले़ शिरूर तालुक्यातील इनामगाव, न्हावरे, निर्वी, निमोणे, गोलेगाव येथे किरकोळ बाचाबाचीच्या घटना घडल्या़ सर्वाधिक ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या खेड तालुक्यात शांततेत सरासरी ९० टक्के मतदान झाले़ अनेक ठिकाणी महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर जाणवत होता़ फक्त २ जागांसाठी मतदान असलेल्या पाडळीत केवळ ३९ टक्के मतदान झाले़ जुन्नरमध्ये अनेक ठिकाणी मोठी चुरस दिसून आली़ तालुक्यात सरासरी ८५ टक्के मतदान झाले आहे़ पुरंदरमध्ये भावकी-भावकीत चुरस दिसून आली़ तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार न घडता सरासरी ८५ टक्के मतदान झाले़ (प्रतिनिधी)