शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: July 19, 2014 03:35 IST

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नारायणगाव आगाराच्या वतीने एसटी संदर्भातील विविध मागण्यांकरिता नारायणगाव आगारात धरणे आंदोलन करण्यात आले़

नारायणगाव : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नारायणगाव आगाराच्या वतीने एसटी संदर्भातील विविध मागण्यांकरिता नारायणगाव आगारात धरणे आंदोलन करण्यात आले़ डिझेलच्या दरात वारंवार होणारी वाढ, टायर व सुट्या भागांच्या किमतीत झालेली वाढ, समपातळीवर नसलेली प्रवासी वाहतूक स्पर्धा, शासकीय प्रतिकूल धोरण यामुळे सन २०१२-२०१३ पासून एसटी तोट्याच्या दिशेने चालली आहे़ एसटीच्या उत्पन्नवाढीकरिता अधिक लक्ष देणे गरजेचे आहे़ तथापि, प्रवाशांच्या गरजेप्रमाणे नवीन गाड्यांच्या व मनुष्यबळाच्या अभावामुळे विस्तार रोखला जात आहे, न्यायालयीन निर्णयानुसार अवैध खासगी प्रवासी वाहतुकीवर संपूर्ण बंदी आणली जात नाही़ त्यामुळे, वार्षिक रू़ ५०० कोटी इतक्या उत्पन्नापासून महामंडळ वंचित राहत आहे़. त्याची भरपाई शासनाने द्यावी, तोट्यातील डेपो बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा़ शासनाने महामंडळाला देय असलेल्या रू़ १६३० कोटी इतकी रक्कम रोख स्वरूपात महामंडळास द्यावी़ पथकरापोटी (टोल टॅक्स) महामंडळास प्रतिवर्षी रू़ १२५ कोटी इतका खर्चाचा बोजा येतो आहे़ एसटी ही सार्वजनिक वाहतुकीचे वाहन असल्यामुळे पथकरातून सूट देण्याबाबतच्या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी सर्वच मार्गावर होणे आवश्यक आहे़. किफायतीशीर नसलेल्या मार्गावरील सेवेमुळे महामंडळास होणाऱ्या वार्षिक रू़ ३३० कोटी आर्थिक तोट्याची प्रतिपूर्वी शासनाने महामंडळास करावी़खासगी बस व एसटी बसमधील विविध करांमध्ये असलेली तफावत दूर करावी़ शासनाने डिझेलवरील विक्रीकर कमी करावा़ यासाठी शासनाने विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागण्यपूर्वी या मागण्यांची पूर्तता करावी; अन्यथा संघटना व्यापक टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहे़ या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून राज्यभर डेपोच्या गेटवर आज दि़ १७ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले़. या वेळी गणेश गाढवे, खजिनदार युवराज गेंगजे, माजी सोसायटी चेअरमन रामदास आंबटकर व दत्ता हाडवळे, बनदेव परदेशी, संजय गाडेकर, पांडे मामा, विठ्ठल रावते, मुक्ता दळवी, प्रकाश शिंदे, सागरे टाकळकर, गणेश रासकर, सिकंदर इनामदार आदी कर्मचारी हजर होते़