शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

निरा नदी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; प्रल्हाद सिंह पटेल यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 20:59 IST

नदीचे सगळ्यात जास्त नुकसान कत्तलखान्यामुळे झाले आहे

बारामती: नीरा नदीच्या प्रदूषणाच्या पाण्याचा प्रश्न आहे. नदीतील पाण्याचा ‘रिपोर्ट’ सात दिवसात येईल. नीरा नदीच्या बाबतीत कठोर कारवाई केली जाईल. जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा सगळ्यांसाठी रिपोर्ट खुला करणार आहे. त्यावेळी लोकांनी सुधारले पाहिजे. अन्यथा त्यांनी कारखाने बंद करायची तयारी ठेवा, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिला आहे. सोमवारपासून (दि ५) केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल दोन दिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. इंदापुर तालुक्यातील दौऱ्यानंतर सायंकाळी केंद्रीय मंत्री पटेल यांनी सोनगांव येथील सोनेश्वराचे दर्शन घेतले. तसेच निरा नदीची पाहणी केली. यावेळी नीरा नदीत बारामती तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने, तसेच फलटण तालुक्यातील कत्तल खाण्याचे दूषित पाणी हे नीरा नदीत सोडल्याचा आरोप नदीकाठच्या ग्रामस्थांनी केला. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. या पार्श्वभुमीवर पटेल बारामती तालुक्यातील निरा वागज येथे गावभेट केला. यावेळी दौऱ्यात बोलताना कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीरा नदीच्या दूषित पाण्याचा प्रश्नावर उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.  यावेळी पटेल पुढे म्हणाले, जमिनीतील पाणी खराब झाले आहे का याची देखील माहिती घ्यावी लागेल. नदीत दूषित पाणी जावू नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. नदीचे सगळ्यात जास्त नुकसान कत्तलखान्यामुळे झाले आहे. नीरा नदीच्या बाबतीत कठोर कारवाई केली जाईल. कारवाई कशी केली जाईल ,हे सांगू शकत नाही. पण संकेत मात्र देऊ शकतो. सुधारा नाहीतर परिणामांना सामोरे जा, असा सज्जड दम देखील पटेल यांनी प्रदुषण करणाऱ्यांना दिला.

...पण बारामती वाल्यांनी अभिनंदन केलं नाही

भाजप नेते राम शिंदे म्हणाले, मी बोलल्या नंतर अहमदनगरचे नामांतर अहिल्या नगर झाले. तुमच्या आमच्या मनातील हे सरकार आहे. बारामती मेडिकल कॉलेजला अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिले. पण बारामतीवाल्यांनी अभिनंदन केलं नाही, याचा खेद वाटतो. मनात आणि ध्यानात असावं लागते तेव्हा ओठावर येतो. देशात आणि राज्यात परिवर्तनाची लाट आहे. पण ती आपल्याकडे का येत नाही यसाठी प्रयत्न सुरू आहेत. नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यावर पटेल साहेब मार्ग काढतील, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीriverनदीpollutionप्रदूषणWaterपाणी