शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातील 'भिडे'पुलाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 10:53 AM

जोपर्यंत पुण्यातील भिडे पुलावरून पाणी वाहत नाही तोपर्यंत पुणेकर दमदार पाऊस झाला असे मानायला चुकुनही तयार होणार नाही.

ठळक मुद्देगुरुवारी रात्री १६,५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे : मुंबईत पाऊस झाला आहे हे समजतं ते हिंदमाता जवळ पाणी भरल्यावर, नाशिकमध्ये दुतोंडया मारुतीच्या बरोबरीने गोदावरी नदीत पाणी वाहू लागल्यावर आणि पुण्यात भिडे पूल पाण्याखाली गेल्यावर...  जोपर्यंत पुण्यातील भिडे पुलावरून पाणी वाहत नाही तोपर्यंत पुणेकर दमदार पाऊस झाला असे मानायला चुकुनही तयार होणार नाही. दरवर्षी पावसाळ्यात पुणेकर भिडे पूल पाण्याखाली गेला हे वाक्य ऐकण्यासाठी प्रचंड आतुर असतात.ते एकदा का कानावर पडलं की पुणेकरांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं अफाट समाधान..

गुरुवारी रात्री खडकवासला धरणातून १६,५०० क्युसेकने शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि बघता बघता भिडे पाण्याखाली गेला..

पुण्याच्या या' भिडे पुला'वर तर सोशल मीडियावर असंख्य मिम्स व्हायरल होतात. हास्याचा महापुर घडवून आणणारा अन् पुणेकरांच्या जीवनाचा स्वाभिमान बनलेला भिडे पूल सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. याच 'भिडे'पुलाची ही गोष्ट..

  १९९६ सालची गोष्ट. पुण्यामध्ये आजच्यासारखी गर्दीही नव्हती, वाहनांची दाटीही नव्हती. पेठांमधून डेक्कनकडे जाण्यासाठी छोटासा कॉजवे किंवा पूल होता. पण जसजशी फर्ग्युसन,bmcc ,mmcc या कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्दळ वाढू लागली तसा हा पूल कमी पडू लागला आणि मग तो पाडून बांधण्यात आला हाच बाबा भिडे पूल. बाबा भिडे हे जेष्ठ विधिज्ञ होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक त्यांचेच नाव या पुलाला देण्यात आले. बाकी वर्षभर या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. चार चाकी वाहनांना परवानगी नसली तरी त्याही सर्रासपणे या पुलाचा वापर करतात.

पुढे झालं असं की पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी सर्वात लहान आणि जेमतेम सव्वा टीएमसी क्षमता असलेलं धरण आहे ते खडकवासला. त्यामुळे खडकवासला धरण अगदी चार-पाच दिवसाच्या मुसळधार पावसाने सुद्धा भरते. शिवाय हे धरण शहरालगत असून बाकीचे पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे बऱ्यापैकी उंचीवर आहे. त्यामुळे तिथून येणारे पाणी खडकवासल्यात साठवलं जाते.खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की तो साधारण पंधरा ते अठरा हजार क्‍युसेक च्या दरम्यान आल्यावर भिडे पूल पाण्याखाली जातो आणि मग दरवर्षी प्रमाणे "यंदाही बाबा भिडे पूल पाण्याखाली" अशा  स्वरूपाच्या बातम्या यायला सुरुवात होते.

आता गंमत अशी आहे की भिडे पूल हा पूल आहे की रस्ता आहे याची शंका यावी अशा पद्धतीने बांधला आहे. इतका कमी उंचीचा आहे आणि रस्ताच्या उंचीला आहे की इतरवेळी तो सर्वसाधारण रस्ता देखील वाटू शकतो. अगदी पाण्याखाली जाण्याच्या एक तास आधीपर्यंत सुद्धा पुलावरून बिनधास्तपणे वाहतूक सुरू असते पण एकदा का पुल पाण्याखाली गेला की मग पुणेकर पुरेसा पाऊस झाल्याचा सुस्कारा सोडतात. पूर्वी लहान मुलांना भिडे पूल पाण्याखाली गेल्यानंतर पूर दाखवायला आणलं जायचं  पण आता  बदलत्या काळाप्रमाणे त्याचे फोटो काढले जातात वायरल केले जातात  मी ठेवले जातात स्टेटस ठेवले जातात पण काहीही असलं तरीही हा पुणेकरांच्या सार्वजनिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हे विसरून चालणार नाही.

टॅग्स :PuneपुणेriverनदीWaterपाणीmula muthaमुळा मुठाRainपाऊसDamधरण