The story of Bhide bridge in Pune which goes under water every monsoon | दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातील 'भिडे'पुलाची गोष्ट

दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातील 'भिडे'पुलाची गोष्ट

ठळक मुद्देगुरुवारी रात्री १६,५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे : मुंबईत पाऊस झाला आहे हे समजतं ते हिंदमाता जवळ पाणी भरल्यावर, नाशिकमध्ये दुतोंडया मारुतीच्या बरोबरीने गोदावरी नदीत पाणी वाहू लागल्यावर आणि पुण्यात भिडे पूल पाण्याखाली गेल्यावर...  
जोपर्यंत पुण्यातील भिडे पुलावरून पाणी वाहत नाही तोपर्यंत पुणेकर दमदार पाऊस झाला असे मानायला चुकुनही तयार होणार नाही. दरवर्षी पावसाळ्यात पुणेकर भिडे पूल पाण्याखाली गेला हे वाक्य ऐकण्यासाठी प्रचंड आतुर असतात.ते एकदा का कानावर पडलं की पुणेकरांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं अफाट समाधान..

गुरुवारी रात्री खडकवासला धरणातून १६,५०० क्युसेकने शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि बघता बघता भिडे पाण्याखाली गेला..

पुण्याच्या या' भिडे पुला'वर तर सोशल मीडियावर असंख्य मिम्स व्हायरल होतात. हास्याचा महापुर घडवून आणणारा अन् पुणेकरांच्या जीवनाचा स्वाभिमान बनलेला भिडे पूल सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. याच 'भिडे'पुलाची ही गोष्ट..

  १९९६ सालची गोष्ट. पुण्यामध्ये आजच्यासारखी गर्दीही नव्हती, वाहनांची दाटीही नव्हती. पेठांमधून डेक्कनकडे जाण्यासाठी छोटासा कॉजवे किंवा पूल होता. पण जसजशी फर्ग्युसन,bmcc ,mmcc या कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्दळ वाढू लागली तसा हा पूल कमी पडू लागला आणि मग तो पाडून बांधण्यात आला हाच बाबा भिडे पूल. बाबा भिडे हे जेष्ठ विधिज्ञ होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक त्यांचेच नाव या पुलाला देण्यात आले. बाकी वर्षभर या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. चार चाकी वाहनांना परवानगी नसली तरी त्याही सर्रासपणे या पुलाचा वापर करतात.

पुढे झालं असं की पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी सर्वात लहान आणि जेमतेम सव्वा टीएमसी क्षमता असलेलं धरण आहे ते खडकवासला. त्यामुळे खडकवासला धरण अगदी चार-पाच दिवसाच्या मुसळधार पावसाने सुद्धा भरते. शिवाय हे धरण शहरालगत असून बाकीचे पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे बऱ्यापैकी उंचीवर आहे. त्यामुळे तिथून येणारे पाणी खडकवासल्यात साठवलं जाते.खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की तो साधारण पंधरा ते अठरा हजार क्‍युसेक च्या दरम्यान आल्यावर भिडे पूल पाण्याखाली जातो आणि मग दरवर्षी प्रमाणे "यंदाही बाबा भिडे पूल पाण्याखाली" अशा  स्वरूपाच्या बातम्या यायला सुरुवात होते.

आता गंमत अशी आहे की भिडे पूल हा पूल आहे की रस्ता आहे याची शंका यावी अशा पद्धतीने बांधला आहे. इतका कमी उंचीचा आहे आणि रस्ताच्या उंचीला आहे की इतरवेळी तो सर्वसाधारण रस्ता देखील वाटू शकतो. अगदी पाण्याखाली जाण्याच्या एक तास आधीपर्यंत सुद्धा पुलावरून बिनधास्तपणे वाहतूक सुरू असते पण एकदा का पुल पाण्याखाली गेला की मग पुणेकर पुरेसा पाऊस झाल्याचा सुस्कारा सोडतात. पूर्वी लहान मुलांना भिडे पूल पाण्याखाली गेल्यानंतर पूर दाखवायला आणलं जायचं  पण आता  बदलत्या काळाप्रमाणे त्याचे फोटो काढले जातात वायरल केले जातात  मी ठेवले जातात स्टेटस ठेवले जातात पण काहीही असलं तरीही हा पुणेकरांच्या सार्वजनिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हे विसरून चालणार नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The story of Bhide bridge in Pune which goes under water every monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.