पाण्यासाठी रास्ता रोको!

By Admin | Updated: August 24, 2015 02:53 IST2015-08-24T02:53:08+5:302015-08-24T02:53:08+5:30

बारामतीच्या जिरायती भागातील लोणी भापकरसह २२ गावांत पुरंदर योजनेचे पाणी सोडावे, चारा डेपो सुरू करावेत, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या आंदोलनाच्या

Stop the way to water! | पाण्यासाठी रास्ता रोको!

पाण्यासाठी रास्ता रोको!

लोणी भापकर : बारामतीच्या जिरायती भागातील लोणी भापकरसह २२ गावांत पुरंदर योजनेचे पाणी सोडावे, चारा डेपो सुरू करावेत, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी येथील हजारो ग्रामस्थांनी लोणी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
पाणी, चारा व रोजगार टंचाईने बारामतीचा जिरायती भागात सध्या घायकुतीला आला आहे. पुरंदर उपसा योजना तातडीने कार्यान्वित करावी. तसेच पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो सुरू करावेत, या मागण्यासाठी लोणी भापकरसह २२ गावांनी दि. २१ आॅगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाचा प्रतिसाद थंडच राहिल्याने हजारो महिला, पुरुष ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी लोणी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सुमारे दोन तास बैलगाड्या, मेंढरांसह रस्त्यावर ग्रामस्थांनी तळ ठोकला होता.
यावेळी शेतकरी कृती समितीचे सतिश काकडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे दशरथ राऊत, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय ढोले, भीमराव पवार, दिलीप जगदाळे, वैष्णवी भापकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शेरे, भापकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. विक्रमसिंह दांगडे पाटील, बाळासाहेब पोमणे तर उपोषणकर्त्यांच्या वतीने हनुमंतराव भापकर यांची भाषणे झाली. यावेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सतीश शिंदे, गजभारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी यांनीच यावे व निवेदन स्वीकारावे, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, दत्तात्रय ढोले, अरविंद गायकवाड, हनुमंत भापकर, मुरलीधर ठोंबरे इादरेनर सांमजस्याची भूमिका घेतली व तणाव निवळला. सलग दुसऱ्या वर्षी उपोषण, आंदोलन करूनही शासन उदासीन राहणार असेल तर आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

Web Title: Stop the way to water!