गुंडगिरीला थांबवा, पुण्याची प्रतिमा वाचवा; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:37 IST2026-02-25T09:37:09+5:302026-02-25T09:37:49+5:30

जर गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रवृत्तींना वेळीच आळा घातला नाही तर मोठी दुर्घटना किंवा प्राणघातक घटना घडू शकते

Stop hooliganism, save Pune's image; Congress delegation requests Police Commissioner | गुंडगिरीला थांबवा, पुण्याची प्रतिमा वाचवा; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांना विनंती

गुंडगिरीला थांबवा, पुण्याची प्रतिमा वाचवा; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांना विनंती

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात अलीकडच्या काळात राजकीय हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे पुण्याची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच आवर घाला, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या शिष्टमंडळात माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चौधरी, राज्य कोषाध्यक्ष ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, महापालिकेतील गटनेते रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम, प्रशांत जगताप, रफिक शेख, अजित दरेकर, अविनाश बागवे यांचा समावेश होता.

महाशिवरात्रीच्या दिवशी भाजपला काँग्रेस भवनापासून फक्त ५० फूट अंतरावर निदर्शने करण्याची परवानगी देण्यात आली. या निदर्शनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनावर दगडफेक केली, ज्यामध्ये अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पत्रकार जखमी झाले. शिवाय, स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका वृत्तपत्र कार्यालयाबाहेर काही गुंडांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या दोन प्रमुख घटनांकडे काँग्रेस शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांचे लक्ष वेधले.

जर गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रवृत्तींना वेळीच आळा घातला नाही तर मोठी दुर्घटना किंवा प्राणघातक घटना घडू शकते. शहरातील शांतता बिघडू नये आणि पुण्याची प्रतिष्ठा टिकून राहावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधावा, अशी विनंती काँग्रेस नेत्यांनी यावेळी केली.

Web Title : गुंडागर्दी रोको, पुणे की छवि बचाओ: कांग्रेस की पुलिस से अपील

Web Summary : कांग्रेस प्रतिनिधिमंडल ने पुणे में बढ़ती राजनीतिक हिंसा को रोकने के लिए पुलिस से आग्रह किया, कांग्रेस भवन और एक पार्टी प्रवक्ता पर हमलों का हवाला दिया, जिससे शहर की प्रतिष्ठा को नुकसान होने का डर है। उन्होंने पुलिस से राजनीतिक नेताओं के साथ जुड़ने का अनुरोध किया।

Web Title : Stop Goondaism, Save Pune's Image: Congress Appeals to Police

Web Summary : Congress delegation urges police to curb rising political violence in Pune, citing attacks on Congress Bhavan and a party spokesperson, fearing escalation and damage to the city's reputation. They requested police to engage with political leaders.