पुण्यात पाेलिसाच्याच डाेक्यात घातला दगड; रेकाॅर्डवरील गुन्हेगारासह दाेघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:12 IST2022-11-19T12:10:11+5:302022-11-19T12:12:14+5:30
जीवघेण्या हल्ल्यात पाेलिस कर्मचारी गंभीर जखमी..

पुण्यात पाेलिसाच्याच डाेक्यात घातला दगड; रेकाॅर्डवरील गुन्हेगारासह दाेघांना अटक
पुणे : रस्त्याच्या कडेला उभा राहून आरडाओरड करीत गाेंधळ घालणाऱ्या दाेघांना गस्तिपथकातील पाेलिसांनी घरी जाण्यास सांगितले. चिडलेल्या दाेघांनी वाद घालत, एका पाेलिस कर्मचाऱ्याच्या डाेक्यात दगड घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जीवघेण्या हल्ल्यात पाेलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. साेलापूर महामार्गावर लाेणी टाेल नाक्याजवळ गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला.
विवेक किशाेर साळुंखे (वय २०) आणि मयूर बबन आंबेकर (वय २८, दाेघेही रा.मांजरी खुर्द) अशी अटक केलेल्या दाेघांची नावे आहेत. पाेलिस शिपाई संदीप धुमाळ (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आराेपींविराेधात लाेणी काळभाेर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. आराेपी विवेक साळुंखे हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.