शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

आजीला मारहाण करून चोरी

By admin | Updated: February 17, 2017 05:10 IST

वयोवृद्ध आजीचे हातपाय बांधून बेदम मारहाण करीत नातवाने तीन साथीदारांच्या मदतीने रोकड लंपास केली. ही घटना गोखलेनगर

पुणे : वयोवृद्ध आजीचे हातपाय बांधून बेदम मारहाण करीत नातवाने तीन साथीदारांच्या मदतीने रोकड लंपास केली. ही घटना गोखलेनगर परिसरात रविवारी दुपारी घडली. चतु:शृंगी पोलिसांनी नातवाला बेड्या ठोकल्या आहेत. तो एका राजकीय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचेही समोर आले आहे. प्रवीण दत्तू डोंगरे (वय २६, रा. वैदूवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत. या प्रकरणी त्याची आजी (वडिलांची आई) तगलू डोंगरे (वय ६६) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरे यांच्या मालकीच्या बाणेर, वैदुवाडी तसेच अन्य ठिकाणी सदनिका आहेत. या सर्व सदनिका त्यांनी भाड्याने दिल्या असून त्याचे साधारणपणे एक ते दीड लाख रुपये भाडे मिळते. आरोपी प्रवीणचे लग्न झालेले आहे. राजकारणाची आवड असलेल्या प्रवीणला पैशांची नेहमी गरज असते. त्यामुळे तो आजीला पैशांसाठी त्रास देऊन पैसे घेऊन जातो.राहते घर नावावर करून देण्यासाठी तो आजीला मारहाण करीत होता. रविवारी त्याने तीन साथीदारांसह डोंगरे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत तोंड दाबून धरले. त्याच्या तीन साथीदारांनी त्यांचे हात व पाय दोरीने बांधले. त्यानंतर लोखंडी सळईने कपाट फोडले. त्यातील ७० हजारांची रोकड चोरून नेली. दरम्यान, डोंगरे यांनी आरडाओरडा करताच शेजारी राहणारा डोंगरे यांचा दुसरा मुलगा व मुलगी धावत आले. त्यांना पाहताच प्रवीण शिवीगाळ करीत पसार झाला. फिर्याद येताच त्याला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)