शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची राज्याकडे साडेपाचशे कोटी थकबाकी

By admin | Updated: September 22, 2015 03:27 IST

राज्य सरकारकडे महापालिकेचे तब्बल साडेपाचशे कोटी रुपये थकीत आहेत. महसूल समितीच्या आज झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली

पुणे : राज्य सरकारकडे महापालिकेचे तब्बल साडेपाचशे कोटी रुपये थकीत आहेत. महसूल समितीच्या आज झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. जकात व आता स्थानिक संस्था करही बंद झाल्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात मोठी तूट आली असून, ती भरून कशी काढायची यावर उपाय शोधण्यासाठी ही बैठक झाली.उपमहापौर आबा बागूल, सहायक आयुक्त विलास कानडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध पावसकर, स्थानिक संस्था कर विभागाचे खेवजी भोईर, तसेच कर आकारणी व करसंकलन विभागाचे विविध अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुद्रांक शुल्क करापोटी महापालिकेला सरकारकडून तब्बल १०० कोटी रुपये येणे आहे. याशिवाय विविध योजनांच्या अनुदानापोटी सरकार महापालिकेला साडेचारशे कोटी रुपयांचे देणे लागत आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने बैठकीत देण्यात आली. महापालिकेची जकात सुमारे १ हजार ४०० कोटी रुपये होती. ती बंद झाल्यानंतर स्थानिक संस्था कर सुरू करण्यात आला. या वर्षीच्या अंदाजपत्रकात स्थानिक संस्था करापोटी तेवढीच रक्कम जमेस धरली असताना सरकारने अचानक हा करही बंद केला. त्याऐवजी महापालिकेला दरमहा निधी देणे सुरू केला. दरमहा साधारण ८१ कोटी रुपयांची ही रक्कम देताना सरकारने मागील महिन्यांची रक्कम कशावर खर्च केली ते कळवणे महापालिकेला बंधनकारक केले आहे. सरकारचे हे धोरण महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडणारे आहे, अशी टीका उपमहापौर बागूल यांनी केली. जकात व आता स्थानिक संस्था करही बंद झाल्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात तब्बल ५०० कोटी रुपयांची तूट पडते आहे. ती भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना सर्वच विभाग सुस्त असल्याबद्दल बागूल यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक संस्था करापोटी सरकार दरमहा जे ८१ कोटी रुपये देत आहे, त्याला अनुदान म्हणणे चुकीचे आहे, तो महापालिकेचा हक्काचा पैसा आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित अनुदान शब्द वगळण्याविषयी कळवावे, अशी सूचना बागूल यांनी प्रशासनाला केली.