शेगर धनगर समाजाचा आज राज्यस्तरीय परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:10 IST2021-01-25T04:10:37+5:302021-01-25T04:10:37+5:30

शेगर धनगर समाजातर्फे दरवर्षी भव्य स्वरूपात वधु वर परिचय मेळावा आयोजित केला जातो. या वर्षीचा हा चौदावा मेळावा आहे. ...

State level introductory meeting of Shegar Dhangar Samaj should be held today | शेगर धनगर समाजाचा आज राज्यस्तरीय परिचय मेळावा

शेगर धनगर समाजाचा आज राज्यस्तरीय परिचय मेळावा

शेगर धनगर समाजातर्फे दरवर्षी भव्य स्वरूपात वधु वर परिचय मेळावा आयोजित केला जातो. या वर्षीचा हा चौदावा मेळावा आहे. याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. लग्न जुळताना येणाºया अडचणी पासून समाज बांधवांना दिलासा मिळावा.एकाच जागेवर वधू-वरांचा परिचय व्हावा. समाज विघातक घटनांना आळा बसावा, विविध ठिकाणांवरून समाज बांधव एकत्र यावेत यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे . मेळाव्याला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे. करोणा प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे सर्वांनी पालन करावे ,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ,ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, सुनिता गावडे,वैशाली पाटील , उषाताई गावडे ,अ‍ॅड. जी.बी गावडे, पांडुरंग मेरगळ, बांधकाम व्यवसायिक उद्धव गावडे,डॉ. शिवाजी गावडे ,डॉ.सरोजिनी खोमणे ,शिवलाल गावडे, वृक्षमित्र भजनदास पवार आदी उपस्थित राहणार आहेत ,अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष सुनील भगत यांनी दिली.

Web Title: State level introductory meeting of Shegar Dhangar Samaj should be held today