शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाने मंजूर केलेली पदे रद्द

By admin | Updated: March 20, 2015 01:02 IST

महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत महापालिकेने सुचविलेली नसतानाही, राज्य शासनाने १३१ जादा पदांची निर्मिती केली आहे.

पुणे : महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत महापालिकेने सुचविलेली नसतानाही, राज्य शासनाने १३१ जादा पदांची निर्मिती केली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या स्वायत्तेवर गदा येणार असल्याने ही पदे रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेत गुुरुवारी घेण्यात आला. महापालिकेचे कामकाज सुरळीत होण्यासाठी पालिकेने २०११मध्ये सेवा प्रवेश नियमावली आणि कर्मचारी आकृतिबंध राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला होता. त्याला आॅगस्ट २०१४मध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यात राज्य शासनाने महापालिकेने न सुचविलेली १३१ पदे निर्माण करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात महापालिका अधिनियम ५१ नुसार, या आकृतिबंधातील पदांची संख्या, पगार निश्चित करण्याचे अधिकर संबंधित महापालिकेला असतात; मात्र राज्य शासनाने त्यात हस्तक्षेप करून ही पदे निर्माण केली आहेत. तसेच, त्यातील काही जागांवर शासनाकडून अधिकारीही प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांना महापालिका सेवेत रुजू न करून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. मात्र, आता ही सर्वच पदे रद्द करण्याचा प्रस्ताव रिपइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि नगरसेवक संजय बालगुडे यांनी दिला होता. त्याला मुख्य सभेत एकमताने मान्यता दिली. (प्रतिनिधी)४महापालिकेतील चतुर्थश्रेणी वगार्तील कर्मचाऱ्यांना आजारामुळे किंवा अपघातामुळे नोकरी गमवावी लागल्यास त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर वारसदाराला नोकरी देण्याच्या निर्णयालाही मुख्य सभेत मान्यता देण्यात आली. या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या व्याधी जडत आहेत. ४परिणामी, त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागते. परंतु, अशा परिस्थितीत त्यांच्या जागी वारसदारांना नोकरी मिळत नाही. तर, प्रशासनाकडून राज्य सरकारने आखून दिलेल्या धोरणाची अंमलबजावणी केली जाते. त्यानुसार २००५ पर्यंत अशा कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळत होती; परंतु त्यानंतर राज्य सरकारने हे धोरण बंद केल्यामुळे महापालिकेतही त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ४हे पालिकेचे कर्मचारी असल्याने तसेच त्यांच्या वेतनाचा भार पालिका उचलणार असल्याने राज्य शासनाच्या नियमांची आडकाठी न आणता अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यास मान्यता देण्यात आली.