एसटी-मोटारसायकलची धडक; दोन जखमी

By Admin | Updated: January 24, 2017 01:31 IST2017-01-24T01:31:19+5:302017-01-24T01:31:19+5:30

एसटी बस व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर

ST-motorbike strike; Two injured | एसटी-मोटारसायकलची धडक; दोन जखमी

एसटी-मोटारसायकलची धडक; दोन जखमी

मंचर : एसटी बस व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर तांबडेमळा गावाच्या हद्दीत गोरक्षनाथ मंदिराजवळ झाला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : एसटी बस ही नारायणगाव येथून पुणेकडे चालली होती. मोटारसायकलवरून दोन शेतकरी शेतातील फरशीपिक घेऊन मंचर बाजार समितीत निघाले होेते. पुणे-नाशिक महामार्गावर तांबडेमळा गावच्या हद्दीतील गोरक्षनाथ मंदिराजवळ एसटी बस व मोटारसायकलची धडक होऊन अपघात झाला.
या अपघातात मोटारसायकलवरील अक्षय दत्तात्रय कोरडे (रा. पानमळा, खेड) व रोहिदास बाबाजी भोर (दोघेही वय १९, रा. जैदवाडी, खेड) दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. राजगुरुनगर एसटी आगारप्रमुखांनी घटनास्थळी भेट दिली. एसटीतील प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नाही. पुढील तपास पोलीस संजय गिलबिले करीत आहेत.

Web Title: ST-motorbike strike; Two injured