शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

भोर येथे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एसटी बस पलटी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 8:26 PM

३० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा चालक हा दारु पिऊन निष्काळजीपणे गाडी चालवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

भोर : एसटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटुन भोर कापुरव्होळ रस्त्यावरील सांगवी गावाजवळ एसटी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत.त्यातील दोनजण गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर एसटी बसच्या पुढील व मागिल काचा फोडुन इतर प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला ही घटना गुरुवारी  सकाळी १०.२० वाजता घडली. अपघातानंतर गाडीचा चालक फरार झाला आहे.   एसटी अपघातात सुमन खोपडे (वय ६० रा. भोलावडे ता भोर),मुक्ताबाई गणपत भिलारे (वय ७० रा .वरोडी ता.भोर) नवनाथ शंकर काटकर (वय ३४ रा हारतळी ता खंडाळा) ,मारुती लक्ष्मण बागल (वय ५५ रा. नाझरे ता.भोर),चंद्रकांत तुकाराम चंदनशिव (वय ५२ रा. किवत ता.भोर), मारुती धोंडीबा झुनगारे (वय ५२ रा. सांगवीभिडे ता.भोर) हे जखमी झाले आहेत दोघेजण गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे.  याबाबत मिळालेली महिती अशी कि आज सकाळी १० वाजता भोर-स्वारगेट हि साधी एस.टी.बस भोर एस.टी स्टॉडवरुन चालक एस.एस.बळी हा घेऊन निघाला गाडीत ३० प्रवासी होते.एस.टी बस सांगवी गाव आणी निरादेवघर कॉलनी यांच्या मधील  उतारावरील रस्त्यावर गाडी आल्यावर एका लहान वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने गाडी बाजुच्या गटारात जाऊन पलटी झाली.यात ६ प्रवासी जखमी झाले.यातील दोघांना मोठया प्रमाणात हाडांची मोडतोड झाल्याने पुण्याला हलविण्यात आले आहे.  अपघाताची महिती मिळताच प्रमोद रवळेकर,रविंद्र वीर,अक्षय दामगुडे सचिन देशमुख,संजय खरमरे,स्वाती मेढेकर,मयुर कांबळे उमेश हौसुरकर,रोहत गायकवाड सांगवी गावातील ग्रामस्थांनी व सहयाद्री रेसक्यु फोर्सने गाडीच्या काचा फोडुन प्रवाशांना बाहेर काढले आणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.अपघातानंतर भोर पोलीस आणि एस.टीचे अधिकारी कर्मचारी हजर झाले. .............

३० प्रवासी घेऊन जाणा-या एसटी बसचा चालक हा दारु पिऊन निष्काळजीपणे गाडी चालवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.रस्त्याच्या जवळ गटारात गाडी पलटी झाली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पुढे अर्धा किलोमीटरवर निरानदीच्या पुलावर घटना घडली असती तर मोठा अर्नथ झाला असता अपघातानंतर चालक फरार झाला आहे.त्यामुळे त्याच्यावरचा संशय अधिकच बळावला आहे. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDiwakar Raoteदिवाकर रावते