पुणे नाट्यसत्ताक रजनीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:51+5:302021-02-05T05:16:51+5:30

लॉकडाऊननंतर प्रायोगिक नाटकांचा पहिलाच महोत्सव पुणे : लॉकडाऊननंतर नाट्यगृहे ५०% क्षमतेने सुरु झाल्यावर ‘पुणे नाट्यसत्ताक रजनी’ हा पहिलाच प्रायोगिक ...

Spontaneous response of the audience to Pune Natyasattak Rajni | पुणे नाट्यसत्ताक रजनीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे नाट्यसत्ताक रजनीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लॉकडाऊननंतर प्रायोगिक नाटकांचा पहिलाच महोत्सव

पुणे : लॉकडाऊननंतर नाट्यगृहे ५०% क्षमतेने सुरु झाल्यावर ‘पुणे नाट्यसत्ताक रजनी’ हा पहिलाच प्रायोगिक नाटकांचा महोत्सव पुण्यात सादर झाला. सोमवारी, २५ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडलेल्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वाईड विंग्स मीडिया आयोजित ‘पुणे नाट्यसत्ताक रजनी’ हा दरवर्षी रात्रभर चालणारा महोत्सव यंदा कोरोनाच्या अटी आणि नियमांमुळे थोडा लवकर संपवण्यात आला. प्रेक्षकांनी रात्रभर चालणाऱ्या या महोत्सवाला शेवटपर्यंत उत्तम प्रतिसाद दिला. नाट्यरंजनीचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर, चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी व पौर्णिमा मनोहर यांच्या हस्ते झाले.

पुणे नाट्यसत्ताक रजनीची सुरुवात "अपरिचित पुलं " या पुलंवरच्या आधारित कार्यक्रमाने झाली.

प्रत्येक नाटकाच्या मध्यंतरात अभिनेता क्षितिज दाते याने जादूचे प्रयोग सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Web Title: Spontaneous response of the audience to Pune Natyasattak Rajni