पक्ष फोडा, घर फोडा,आता प्रभाग फोडा; राज्य सरकारचे फोडाफोडेची राजकारण, सुप्रिया सुळेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:43 IST2025-08-25T15:42:17+5:302025-08-25T15:43:38+5:30
ताकदवर लोकांनी उत्तम काम केले, त्यांचेच प्रभाग फोडले आहेत, ही तर राज्य सरकारची मनमानी

पक्ष फोडा, घर फोडा,आता प्रभाग फोडा; राज्य सरकारचे फोडाफोडेची राजकारण, सुप्रिया सुळेंची टीका
पुणे : पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सत्तेतील काही पक्षासह अन्यपक्षामध्ये असवस्था आहे. जे काही ते पारदर्शकपणे व्हावे. कुठल्याही राजकीय दबावाखाली होउ नये . एकाला सोयीप्रमाणे प्रभाग रचना करू नका. नागरिक केंद्रबिंदु असला पाहिजे. निवडणुक जिकणे हा केंद्रबिदु कसा असु शकतो. ताकदवर लोकांनी उत्तम काम केले. त्यांचेच प्रभाग फोडले आहेत. ही मनमानी आहे. पक्ष फोडा, घर फोडा,आता प्रभाग फोडा. नुसते फोडाफोडेची राजकारण राज्यसरकार करत असल्याची टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकाराशी बोलताना केली.
शहरातील विविध प्रश्नाबाबत पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह विविध अधिका०याबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सचिन दोडके यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर सुप्रिया सुळे पत्रकारशी बोलत होत्या.
प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सुचनासाठी ४ सप्टेबर मुदत दिली आहे. पण गणेशोत्सवाचा कालावधी आला आहे. त्यामुळे हरकती आणि सुचनासाठी १० स्प्टेंबर पर्यत मुदत दयावी अशी मागणी राज्य निवडणुक आयोगाकडे करणार आहे. त्यासाठी पत्र ही देणार आहे. महापालिकेची निवडणुक ही कार्यकत्याची निवडणुक आहे. त्यामुळे कार्यकत्याच्या पाठीमागे सर्वाना उभे राहिले पाहिजे. एकाला सोयीप्रमाणे प्रभाग रचना करू नका. नागरिक केंद्रबिंदु असला पाहिजे. निवडणुक जिकणे हा केंद्रबिदु कसा असु शकतो. ताकदवर पुणे आणि मुंबईत लोकांनी उत्तम काम केले. त्यांचेच प्रभाग फोडले आहेत. ही मनमानी आहे. राज्याच्या सत्तेतील सर्वात मोठा पक्षाने अन्याय केला आहे. सत्तेतील काही पक्षानी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अन्याया विरोधात बोलणे ही नैतीक जबाबदारी आहे. कायदयानसार प्रभाग रचना झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी एका खात्यावर नाराजी व्यक्त केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
लाडकी बहिण योजनेतील भ्रष्टाचाराबाबत जनहित याचिका दाखल करणार
लाडकी बहिण योजनेतील साफटवेअरमध्ये पुरूष आणि स्त्री कळले नाही का असा सवाल करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, या योजनेत ४ हजार ८०० कोटीचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या योजनेच्या भ्रष्टाचाराबाबत जनहित याचिका दाखल करणार आहे. राज्यातील महायुतीच्या सरकारच्या काळात दर तीन तासला एक शेतकरी आत्महत्या करत आहेयाकडेही त्यांनी लक्ष वेधले.