शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गावकीच्या राजकारणात विखुरले गट-तट

By admin | Updated: August 3, 2015 04:21 IST

कासुर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. गावातील स्थानिक गट-तट निवडणुकीच्या राज

यवत : कासुर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. गावातील स्थानिक गट-तट निवडणुकीच्या राजकारणात स्पष्टपणे जाणवत असून, संपूर्ण जागांवर एकच पॅनल उभे न करता ठिकठिकाणी सोयीचे राजकारण करत स्वत:च्या वॉर्डापुरते बघत असल्याचे दिसून येत आहे.एकूण १३ जागा असलेली कासुर्डी ग्रामपंचयतीमधील सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने मोठी चुरस निवडणुकीत दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांना लक्ष्मीदर्शनदेखील घडत आहे. १३ पैकी वॉर्ड क्र.३ मधून एका जागेवर वाल्मीक आखाडे बिनविरोध निवडून आले आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता, तालुक्यातील इतर ग्रामपंचयतीमध्ये दिसणारे कुल व थोरात या गटा-तटाचे राजकारण कासुर्डी मधील गावकीच्या राजकारणात विखुरले गेले आहे.वॉर्ड क्र.१ मध्ये ग्रामदैवत श्रीभैरवनाथ पॅनलचे-बापू ठोंबरे, छाया सोनवणे, श्रीभैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे-सखाराम तांबे, विजया सोनवणे व अपक्ष-अशोक होले यांच्यात लढत आहे.वॉर्ड क्र.२ मध्ये ग्रामदैवत श्रीभैरवनाथ पॅनलचे-गुलाब वैरागे, रंजना ठोंबरे, श्रीभैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे-जनार्धन कसबे, कलावती ठोंबरे व अपक्ष-उत्तम सोनवणे यांच्यात लढत आहे.वॉर्ड क्र.३ मध्ये श्रीभैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे-अमर अनपट, संदीपा आखाडे, जावजीबुवा विकास आघाडीचे-संतोष आखाडे, अलका राजवडे व इतर मयूर आखाडे, नलिनी राजवडे यांच्यात लढत आहे.वॉर्ड क्र.४मध्ये श्रीभैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे-पांडुरंग आखाडे, दीपा जांभळे, कल्पना ठोंबरे, वाघजाई विकास आघाडीचे-मच्छिंद्र जगताप, मनीषा आखाडे, प्रतिभा भंडलकर यांच्यात सरळ लढत होत आहे. वॉर्ड क्र. ५मध्ये श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे-सोपान गायकवाड, मंगल वीर, विजया सोनवणे, ग्रामदैवत श्रीभैरवनाथ पॅनलचे-बंडू गायकवाड, मनीषा आखाडे, जयश्री सोनवणे व अपक्ष-अशोक होले यांच्यात लढत आहे.यवत : भरतगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन पॅनल व काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होत आहे.विद्यमान आमदार राहुल कुल गटाचा जनसेवा पॅनल, माजी आमदार रमेश थोरात गटाचा भैरवनाथ पॅनल, तसेच भाजपा व इतर गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तयार केलेला भरतेश्वर पॅनल यांच्यात ग्रामपंचायतीसाठी चुरस आहे. एकूण ९ जागांसाठी २३ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. सरपंचपद इतर मागासवार्गासाठी राखीव आहे.विद्यमान सरपंच विलास जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, बिभीषण जगदाळे, बापू थोरात यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलने सर्व वॉडॉत उमेदवार उभे केले आहेत, तर उत्तम टेमगिरे, अर्जुन टेमगिरे, प्रवीण इंगळे, दत्तात्रय टेमगिरे यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ पॅनलने सहा उमेदवार उभे केले आहेत. तर, भरतेश्वर पॅनलनेदेखील सहा उमेदवार उभे केले आहेत. दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड क्र.१ मधून जनसेवा पॅनलचे : विलास जगदाळे, वैशाली जगदाळे, संगीता जगताप, भरतेश्वर पॅनलचे नितीन ताम्हाणे, सविता थोरात, नंदा बारवकर व अपक्ष भीमाबाई ताम्हाणे यांच्यात लढत आहे. वॉर्ड क्र.२ मधून जनसेवा पॅनलचे : भाऊसाहेब कोलते, संगीता टेमगिरे, सरला विठ्ठल कारंडे, भैरवनाथ पॅनलचे : देविदास टेमगिरे, नंदा टेमगिरे, रेखा जाधव, भरतेश्वर पॅनलचे - चैत्राली गुलदगड, अंजना नवले, गोविंद डोंबाळे व अपक्ष - आनंद शेलार यांच्यात लढत आहे. वॉर्ड क्र.३ मधून जनसेवा पॅनलचे : गणेश कोळपे, गुलाब हाके, वैशाली हाके, भैरवनाथ पॅनलचे सावळाराम हाके, सुनीता जगताप, पप्पू हाके यांच्यात लढत आहे. (वार्ताहर)