Pune: भरधाव टेम्पोची पादचारी कुटुंबाला धडक; सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:56 IST2024-04-08T19:55:56+5:302024-04-08T19:56:52+5:30

टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध सुरु

Speeding tempo pedestrian hits family Death of a six year old child | Pune: भरधाव टेम्पोची पादचारी कुटुंबाला धडक; सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू

Pune: भरधाव टेम्पोची पादचारी कुटुंबाला धडक; सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू

बिबवेवाडी: भरधाव टेम्पोने पादचारी दाम्पत्याला धडक दिल्याची घटना बिबवेवाडी भागातील डाॅल्फिन चौकात घडली असून अपघातात सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला.रुद्र सचिन शिंदे ( ६) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. चिमुकल्याचा मृतदेह पाहून परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी सचिन शिंदे ( ३२, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातात शिंदे यांच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

 शिंदे दाम्पत्य रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास डाॅल्फिन चौकातून अप्पर इंदिरानगरकडे निघाले होते. शिंदे यांच्याबरोबर सहा वर्षांचा मुलगा रुद्र होता. भरधाव टेम्पाेने पाठीमागून शिंदे दाम्पत्याला धडक दिली, या अपघातात शिंदे यांची पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुद्र टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Speeding tempo pedestrian hits family Death of a six year old child