पुण्यातील रिंग रोडच्या कामाला मिळणार गती; केंद्राकडून २ हजार ४६८ कोटी रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 11:43 IST2018-02-12T11:42:34+5:302018-02-12T11:43:36+5:30
केंद्र शासनाच्या भारतमाला प्रकल्पातून पीएमआरडीए अंतर्गत केल्या जाणाऱ्या रिंगरोड साठी केंद्राकडून २ हजार ४६८ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे रिंग रोडच्या कामाला गती मिळणार आहे.

पुण्यातील रिंग रोडच्या कामाला मिळणार गती; केंद्राकडून २ हजार ४६८ कोटी रुपयांचा निधी
पुणे : केंद्र शासनाच्या भारतमाला प्रकल्पातून पीएमआरडीए अंतर्गत केल्या जाणाऱ्या रिंगरोड साठी केंद्राकडून २ हजार ४६८ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे रिंग रोडच्या कामाला गती मिळणार आहे.
पुण्याचा बहुचर्चित १२८ किमी लांबीच्या रिंग रोड प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली असून पीएमआरडीएने रिंग रोडसाठी लागणारी जमीन ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत १२ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. केंद्राने पुणे आणि बंगळुरू या दोन रिंग रोड प्रकल्पाना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे २०१८-१९ या वर्षासाठी केंद्राने अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद केली आहे.
पीएमआरडीएकडून केल्या जाणाऱ्या रिंग रोडसाठी सुमारे १७ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पीएमआरडीएने रिंग रोडच्या कामाबाबत निविदा काढली आहे. त्यात आता केंद्राकडून निधी मिळाल्याने रिंग रोडचे काम जलद गतीने सुरू करणे शक्य होणार आहे.