'अरे आव्वाज कुणाचा' च्या जयघोषात स.प महाविद्यालयाने पुरुषोत्तम महाकरंडकावर नाव कोरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:30 IST2025-12-29T16:29:41+5:302025-12-29T16:30:52+5:30
सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा कुमार जोशी करंडक रत्नागिरी येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजीने सादर केलेल्या ‘ठोंग्या’ या एकांकिकेला मिळाला

'अरे आव्वाज कुणाचा' च्या जयघोषात स.प महाविद्यालयाने पुरुषोत्तम महाकरंडकावर नाव कोरले
पुणे: ‘पुरुषोत्तम करंडक कुणाचा; एसपी वाल्यांचा’, ‘आमचं नाटक आम्ही बसवतो, ‘आवाज कुणाचा एसपी कॉलेजचा’, ‘आले रे आले एसपी आले’ च्या जयघोषात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सर परशुरामभाऊ महाविद्यालच्या ‘आतल्या गाठी’ या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा कुमार जोशी करंडक रत्नागिरी येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजीने सादर केलेल्या ‘ठोंग्या’ या एकांकिकेला मिळाला.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या महाअंतिम फेरीत एकूण १७ संघांनी सादरीकरण केले. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. २८) सायंकाळी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष सुहास जोशी, परीक्षक चंद्रशेखर ढवळीकर, संजय पवार, अमित फाळके मंचावर होते. स्पर्धेचा निकाल ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी जाहीर केला. सांघिक द्वितीय आलेल्या ‘ग्वाही’ या एकांकिकेस श्रीराम करंडक तर सांघिक तृतीय आलेल्या ‘काही प्रॉब्लेम ये का?’ या एकांकिकेस पंडित विद्याधर शास्त्री भिडे करंडक मिळाला.
नाट्य क्षेत्रात करिअर घडवायचे असल्यास तर चिकाटी सोडू नका. जास्तीत जास्त मेहनत करा. तरुणांचे प्रश्न समजण्यासाठी राजकारण्यांनी पुरुषोत्तमच्या रंगमंचावरील एकांकिका पाहाव्यात- मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेते
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
सांघिक प्रथम : आतल्या गाठी (सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे)
सांघिक द्वितीय : ग्वाही (देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सांघिक तृतीय : काही प्रॉब्लेम ये का? (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे)
सर्वोकृष्ट प्रायोगिक करंडक : ठोंग्या (फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी).
वैयक्तिक पारितोषिके
सर्वोकृष्ट अभिनय : पुरुषोत्तम नारायण गाडगीळ करंडक : अभिषेक हिरेमठस्वामी (पोस्टमन, ग्वाही, देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
अभिनय नैपुण्य : पुरुष : दिशा फाऊंडेशन करंडक : पार्थ पाटणे (विनायक, ग्वाही, देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
अभिनय नैपुण्य : स्त्री : अक्षरा बारटक्के (मंगला ग्वाही, देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सर्वोकृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य : विश्वास करंडक : शाश्वती वझे (जुई, आतल्या गाठी, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे)
सर्वोकृष्ट दिग्दर्शक : चैतन्य प्रणित करंडक : अद्वय पुरकर, शाश्वती वझे, समर्थ खळदकर (आतल्या गाठी, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे)