पुण्याच्या सोनितने मिळवले बालशौर्य पारितोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:20+5:302021-02-05T05:16:20+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर केला जातो. यंदा शैक्षणिक क्षेत्रातील ...

Sonit from Pune won the Child Bravery Award | पुण्याच्या सोनितने मिळवले बालशौर्य पारितोषक

पुण्याच्या सोनितने मिळवले बालशौर्य पारितोषक

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर केला जातो. यंदा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुण्यातील पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल मधील सोनित सिसोलेकर याची बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मंगळवारील माती आणि झाडांच्या वाढीबाबत केलेल्या संशोधनाबद्दल सोनितने राष्ट्रीय पातळीवरील संशोधन स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक मिळवले आहे. तसेच पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाच्या विभागाचे प्राध्यापक रेमंड दुरही स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दख्खनच्या पठारावरील आणि पुन्हा पुण्यातील लाव्हा ट्यूब या विषयावर सध्या तो संशोधन करत आहे. येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या नासाच्या परिषदेमध्ये जाण्याची त्याला संधी मिळाली आहे. लुणार प्लॅनेटरी सायन्स कॉन्फरन्समध्ये त्याला सहभागी होता येणार आहे.

सोनित म्हणाला, लहानपणी माझ्या वडिलांनी मला टेकड्यांवर फिरवले. त्यामुळे विविध खडकांची ओळख झाली.तसेच एम. एस. मक्खी यांचे दगडांचे प्रदर्शन पाहून मला या क्षेत्रात संशोधन करण्याची आवड निर्माण झाली. इंडियन नॅशनल सायन्स अँड इंजिनिअरिंग फेअर मध्ये केलेल्या संशोधनासाठी मला पारितोषिक मिळाले. तेव्हापासून मी या क्षेत्रातील संशोधन करत आहे.

-------------

मी सध्या मंगळावरील माती बाबत संशोधन करत असून भविष्यात जर मानवाला परग्रहावर राहावे लागले तर चंद्र त्यासाठी चांगला पर्याय आहे. तेथील लाव्हा ट्युबमध्ये मानवाला वसाहती करून राहता येऊ शकते, असेही सोनित म्हणाला.

----------------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये जाऊन कार्यक्रमात सहभागी होता येणे शक्य नसल्यामुळे सर्व बाल शौर्य पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. आपण केलेले संशोधन ही केवळ सुरुवात असून संशोधन क्षेत्रात देशाचे नाव मोठे करावे,असे प्रोत्साहन नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेतून मिळाले, असेही सोनितने सांगितले

Web Title: Sonit from Pune won the Child Bravery Award