शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

...तर आम्हाला सकाळी ७ ला विसर्जन मिरवणुकीला परवानगी द्या : गणेश मंडळांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 1:30 PM

मानाचे गणपती व त्यानंतर शेवटचे गणपती हेच मिरवणुकीतील बहुतांश वेळ घेत असल्याने आमची सव्वाशे वर्षे जुनी गणेश मंडळे असूनही दुसऱ्या दिवशी आम्हाला मिरवणुकीत सहभागी व्हावे लागते..

ठळक मुद्देपहिल्या पाच मानाच्या गणपतीच्या पदाधिकाऱ्याची रात्री उशिरा बैठक होणारसकाळी लवकर मिरवणुक सुरु करण्यास लक्ष्मी रोडने जाणाऱ्या २२ मंडळाने तयारी

पुणे : मानाची गणपतींची मिरवणुक सकाळी ७ वाजता सुरु करा नाही तर आम्हाला सकाळी मिरवणुक काढायला परवानगी द्या, अशी मागणी लक्ष्मी रोडने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी पोलिसांकडे केली आहे़. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पेच निर्माण झाला आहे़. याबाबत मानाच्या पाच मंडळांची बैठक आज रात्री होणार असून त्यात त्यांची भूमिका ठरविणार आहेत़. विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रोडवरुन जाणाऱ्या गणेश मंडळांची बैठक सोमवारी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली़. लक्ष्मी रोडवरुन मुख्य मिरवणुक सकाळी साडेदहा वाजता सुरु होते़. त्यात पहिल्या ५ मानाच्या गणपतीनंतर इतर मंडळांना सोडण्यात येते़. लक्ष्मी रोडवरुन जाणाऱ्या अनेक मंडळांनी मानाचे गणपती व त्यानंतर शेवटचे गणपती हेच मिरवणुकीतील बहुतांश वेळ घेत असल्याने आमची सव्वाशे वर्षे जुनी गणेश मंडळे असूनही दुसऱ्या दिवशी आम्हाला मिरवणुकीत सहभागी व्हावे लागते, अशी तक्रार केली़. याबाबत सहकार तरुण मंडळाचे अध्यक्ष भाऊ करपे यांनी सांगितले की, या बैठकीत मानाच्या गणपतींनी अगोदर मिरवणुक सुरु करावी, म्हणजे मिरवणुक लवकर संपेल व सर्वांना सहभागी होण्यास उशीर होणार नाही़. त्यांनी लवकर सुरुवात केली तर त्यांच्या मागाहून जाऊ़ जर मानाचे गणपती लवकर मिरवणुक सुरुवात करणार नसतील तर त्यांच्या अगोदर आम्हाला सकाळी ७ वाजता मिरवणुक काढण्यास परवानगी द्यावी, अशी आम्ही काही मंडळांनी मागणी केली़ तसा अर्ज गणेश पेठ पांगुळअळी ट्रस्टने केला आहे़. त्याला शंभर ते सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या अनेक मंडळांनी पाठिंबा दर्शविला आहे़. पोलिसांनी अशी परवानगी दिली तर आम्ही लवकर मिरवणुक काढू असे सांगितले आहे़. या बैठकीत राजेंद्र कोंढरे, विकास ढमाले, शैलेश बडाई, विजय मारटकर, संजय बालगुडे यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दर्शविला आहे़. सकाळी लवकर मिरवणुक सुरु करण्यास लक्ष्मी रोडने जाणाऱ्या २२ मंडळाने तयारी दर्शविली आहे़. यावर पोलिसांनी मानाच्या गणपती मंडळांशी याबाबत बोलून योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगितले़. पहिल्या पाच मानाच्या गणपतीच्या पदाधिकाऱ्याची रात्री उशिरा बैठक होणार असून त्यात ते भूमिका ठरविणार आहेत़ .

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिसGanesh Visarjanगणेश विसर्जन