स्वीकृत नगरसेवकासाठी लघुउद्योजकांचे साकडे

By Admin | Updated: May 9, 2017 03:47 IST2017-05-09T03:47:59+5:302017-05-09T03:47:59+5:30

पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध असूनही उद्योग क्षेत्रातील एकही प्रतिनिधी महापालिका सभागृहात नाही.

Small-time corporators' pledge for approved councilors | स्वीकृत नगरसेवकासाठी लघुउद्योजकांचे साकडे

स्वीकृत नगरसेवकासाठी लघुउद्योजकांचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध असूनही उद्योग क्षेत्रातील एकही प्रतिनिधी महापालिका सभागृहात नाही. महापलिकेशी संबंधित औद्योगिक परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्याची पालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करावी, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लघु उद्योग संघटना पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात लघु व मध्यम उद्योगाचे विविध स्वरूपाचे प्रश्न सोडवण्याचे काम गेल्या ३९ वर्षांपासून करीत आहे. संघटनेचे ४००० सभासद आहेत.
संघटनेने पिंपरी-चिंचवड महापालिका, एम.आय.डी.सी., महावितरण, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पोलीस प्रशासन या शासकीय संस्थांशी संबंधित अनेक प्रश्न सोडवले आहेत. तरी संघटनेला स्वीकृत नगरसेवकपदी संधी मिळावी, अशी मागणी अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, खजिनदार संजय ववले यांनी केली आहे.

Web Title: Small-time corporators' pledge for approved councilors