Pune: रस्त्याच्या मध्यभागी झोपणे जीवावर बेतले; अंगावरून कार गेल्याने तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 20:03 IST2025-05-14T20:02:48+5:302025-05-14T20:03:40+5:30

कारचालक फरार झाला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी कार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली

Sleeping in the middle of the road is life-threatening Young man dies after being run over by a car | Pune: रस्त्याच्या मध्यभागी झोपणे जीवावर बेतले; अंगावरून कार गेल्याने तरुणाचा मृत्यू

Pune: रस्त्याच्या मध्यभागी झोपणे जीवावर बेतले; अंगावरून कार गेल्याने तरुणाचा मृत्यू

पुणे : रस्त्याच्या मध्यभागी झोपणे तरुणाच्या जीवावर बेतले. अंगावरून कार गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा अपघात १२ मे रोजी ताडीवाला रस्ता परिसरातील सौरभ हॉलसमोर घडला आहे. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरोज सुदर्शन बिश्वाल (४५, रा. वडगाव शेरी, मूळ रा. ओरीसा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोज बिश्वाल मूळचा ओरीसातील असून, तो १२ मे रोजी ताडीवाला रस्ता परिसरातील सौरभ हॉलसमोर रस्त्याच्या मधोमध झोपला होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कार चालकाने त्याच्या अंगावर कार चढवली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या सरोजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी कार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप खेडकर करत आहेत.

Web Title: Sleeping in the middle of the road is life-threatening Young man dies after being run over by a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.