शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

भावाला किडनी देऊन बहिणीचे रक्षाबंधन!

By admin | Updated: September 2, 2015 04:07 IST

बहीण-भावाच्या नात्यात रक्षाबंधन साजरे करताना बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर असते. परंतु, चक्क जिवाची पर्वा न करता आपल्या भावाला आपली किडनी देणाऱ्या बहिणीने नात्याचा

अशोक खरात, खोडदबहीण-भावाच्या नात्यात रक्षाबंधन साजरे करताना बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर असते. परंतु, चक्क जिवाची पर्वा न करता आपल्या भावाला आपली किडनी देणाऱ्या बहिणीने नात्याचा सुरेख आदर्श तरुणाईसमोर उभा केला आहे. ही बहीण आहे योगिता फापाळे. जुन्नरमधील येडगावची! बहिणीने भावाला दिलेली ही खऱ्या अर्थाने अनमोल भेट ठरली आहे. योगिताने तिच्या लहान भावाला आपली किडनी बहाल केली. त्यामुळे ती सगळीकडे कौतुकास पात्र ठरत आहे. येडगावमध्ये राहणाऱ्या यादव हांडे यांना दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. दोन्ही मुलींची लग्ने झाली. तुषारला वयाच्या २१व्या वर्षापासून किडनीची तक्रार सुरू झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला लहानपणापासून एक किडनीच नव्हती. एका किडनीवर तो व्यवस्थित जगत होता. पण, २१व्या वर्षानंतर त्याच्या दुसऱ्या किडनीलाही त्रास सुरू झाला व ती फेल होत असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. सुरुवातीला आयुर्वेदिक उपचार करून त्यानंतर डायलिसिस करण्यात ४-५ वर्षे गेली. त्यानंतर मात्र त्याला आता ताबडतोब किडनीची व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. इतक्या कमी कालावधीत डोनर मिळणे अवघड होते. त्यांनी शोधही घेतला; पण व्यर्थ! घरातील लोकांची तपासणी केली, तेव्हा फक्त वडील आणि योगिता यांचीच किडनी जुळली. पण वडिलांची एक किडनी आधीच खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे फक्त योगिताचा शेवटचा पर्याय उरला. योगिता विवाहित होती, त्यामुळे तिच्या घरच्यांची अनुमतीदेखील आवश्यक होती. योगिताला सात वर्षांची एक लहान मुलगी आहे. योगिता पुण्यात नोकरी करते. भावासाठी हा त्याग करण्याचे तिने ठरवले. घरच्यांचीही परवानगी मिळवली आणि दोन महिन्यांची रजा टाकली. दरम्यानच्या काळात गर्भपिशवी काढण्याचे एक आॅपरेशनही तिला करावे लागले. सारे ताणात असताना योगिता मात्र हसतमुख राहून सामोरी गेली आणि आपली एक किडनी भावासाठी दिली. आपल्यामुळे भावाचा जीव वाचला याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होते.