Silence, robbary continuously started in the city three more incidents of burglary | शांतता...घरफोडी अजून सुरुच आहे..!
शांतता...घरफोडी अजून सुरुच आहे..!

ठळक मुद्देघरफोडीच्या आणखी तीन घटना

पुणे :  दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस प्रशासने सांगितल्यानुसार आवश्यक ती काळजी घेतल्यानंतर देखील चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. शहरातील मध्यवस्तीत दिवसाढवळया घरात शिरुन लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविण्याचे प्रकार अद्याप सुरु आहेत. दरदिवशी होणाऱ्या घरफोड्यांकडे शांतपणे बघत राहायचे का? असा प्रश्न आता नागरिकांनी पोलिस प्रशासनाला विचारला आहे. 
 एरंडवणे येथील सुशिलानगरी इमारतीत 17 ते 18 ऑगस्ट दरम्यान घरफोडीची घटना घडली. यात चोरट्यांनी मौल्यवान घडयाळ, सोन्या चांदीचे तसेच हि-याचे दागिने असा एकूण 7 लाख 93 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरला. याप्रकरणी धवल जोशी (वय 33, रा.एरंडवणे) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोशी हे बाहेरगावी गेले असताना त्यांंच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुम मधील कपाटातून घडयाळ, सोन्या चांदीचे व हि-याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणाचा तपास अलंकार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एच ए ढोले हे करीत आहेत. वडगाव शेरी तील सोपानगर भागात चोरट्यांनी घरफोडी करुन 2 लाख 62 हजारांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी चंद्रकांत भोसले (वय 32, रा.सोपाननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याठिकाणी 19 आॅगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 दरम्यान घरफोडी करण्यात आली.  त्यातून सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस.चव्हाण करीत आहेत. 
 घरफोडीची तिसरी घटना येरवड्यातील कल्याणीनगर भागात घडली. फिर्यादी प्रदीप अगरवाल (वय 50, रा. कल्याणीनगर) यांच्या घरातील काचेच्या स्लायडिंगच्या बाहेरील लोखंडी गेटचा कोयंडा तोडून चोरट्यांनी 2 लाख 44 हजारांचा ऐवज चोरुन नेला. यात कपाटातील 14 हजार रुपयांची रोख रक्कम, एक तिजोरी, सोन्याचे - चांदीचे नाणे, व घराच्या चाव्या असे चोरी गेलेल्या मुद्देमालाचे स्वरुप आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी ए ननावरे पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: Silence, robbary continuously started in the city three more incidents of burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.