श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ९ जानेवारीपासून ३ महिन्याकरिता बंद; मात्र महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले राहणार - जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:34 IST2025-12-27T13:33:49+5:302025-12-27T13:34:30+5:30

नित्य पूजा सुरू राहणार असून या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही.

Shri Kshetra Bhimashankar Temple to be closed for 3 months from January 9 However, it will be open for darshan on Mahashivratri - District Collector | श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ९ जानेवारीपासून ३ महिन्याकरिता बंद; मात्र महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले राहणार - जिल्हाधिकारी

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ९ जानेवारीपासून ३ महिन्याकरिता बंद; मात्र महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले राहणार - जिल्हाधिकारी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरमंदिरातील देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगाने मंदिर भाविकांसाठी ९ जानेवारी २०२६ पासून पुढील ३ महिन्यांसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी सहकार्य करावे- असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे. 

राज्य शासनाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी तसेच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेता २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार व श्री. भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीत सर्वाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि भाविकांच्या सोयी करिता महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये  मंदीर भाविकांकरिता दर्शनाकरिता खुले राहणार आहे.

सन २०२७ मध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. त्यापूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ २०२५ च्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांकडून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. कामाचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असल्याने मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद करण्यात येणार आहे.

नित्य पूजा सुरू राहणार: मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकर यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार व नियोजित वेळेत सुरू राहतील.

थेट दर्शन बंद : या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही.

प्रवेशावर निर्बंध : बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी

"श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय मंदीर संस्थानने घेतलेला असून भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना पूर्ण सहकार्य करावे."

Web Title : भीमाशंकर मंदिर 3 महीने के लिए बंद, महाशिवरात्रि पर खुला रहेगा

Web Summary : भीमाशंकर मंदिर 9 जनवरी 2026 से तीन महीने के लिए बंद रहेगा, सिवाय महाशिवरात्रि के। यह निर्णय मंदिर के रखरखाव और 2027 में नासिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ मेले से पहले बुनियादी ढांचे में सुधार के लिए किया गया है, जिससे भक्तों के लिए सुविधाएं और सुरक्षा बेहतर होगी।

Web Title : Bhimashankar Temple Closed for 3 Months, Open for Mahashivratri.

Web Summary : Bhimashankar temple will be closed for three months from January 9th, 2026, excluding Mahashivratri, for maintenance. This ensures timely completion of infrastructure upgrades before the Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela in 2027, improving facilities and safety for devotees.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.