शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो प्रकल्पासाठी इच्छाशक्ती दाखवा!

By admin | Updated: March 23, 2015 00:47 IST

गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र, राज्य व महापालिकेच्या अर्थसंकल्पात एकावेळी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे : गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र, राज्य व महापालिकेच्या अर्थसंकल्पात एकावेळी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अद्याप मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही) या स्वतंत्र कंपनीच्या स्थापनेची प्रतीक्षा आहे. त्यामुळे केवळ निधी मिळून चालणार नाही, तर प्रकल्प मंजुरीसाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी राजकीय इच्छाशक्ती दाखविणे गरजेचे आहे. राज्य शासनाने पुणे व नागपूर मेट्रो प्रकल्पाचे प्रस्ताव एकावेळी केंद्र शासनाकडे पाठविले होते. मात्र, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे पुण्याअगोदर नागपूर मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली. त्यानंतर पुण्याऐवजी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम)चा प्रकल्प नागपूरला नेण्यात आला. मग, दोन्ही प्रकल्पाला निधी देण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत. पुण्याविषयी वेगळे चित्र आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातही मेट्रोसाठी केंद्राने निधीची तरतूद केली होती. मात्र, प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अपूर्ण असल्याने मेट्रो ट्रॅकवर आली नव्हती. आता पुन्हा केंद्र व राज्याने निधी कोट्यवधीचा निधी दिला आहे. त्यामुळे हुरळून जाऊन चालणार नाही. मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी ‘एसपीव्ही’चे आदेश काढण्यात आले. मात्र, ही स्वतंत्र कंपनीची स्थापना व त्यावरील नियुक्तीची प्रक्रिया अद्याप पार पडलेली नाही. नागपूरप्रमाणे पुण्यातही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शतप्रतिशत भाजपाला पुणेकरांनी प्रतिसाद दिला. सद्य:स्थितीत शहरात भाजपाचे एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्पासह शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी कोणाचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाही. ‘पीएमआरडीए’ची प्रतीक्षागेल्या १५ वर्षांपासून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीलगतच्या परिसरात एकात्मिक व नियोजनबद्ध विकासासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या स्थापनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानुसार नगररचना संचालकांनी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात त्याविषयीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप पीएमआरडीए स्थापनेची प्रतीक्षा आहे.