शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक गॅसचा तुटवडा; लाकूड अन् कोळशाकडे नागरिकांचा ओढा, पुण्यात पेटल्या चुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:37 IST

नागरिक व लहान खानावळी लाकूड-सरपण, कोळसा आणि पारंपरिक शेगड्यांचा वापर सुरू केल्याने वाढत्या मागणीमुळे या साहित्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे

अजित गस्ते 

पुणे: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या भडक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात आज ही घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट फटका हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना बसत असून, पर्यायी इंधन म्हणून आता लाकूड आणि कोळशाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे.

वाढत्या मागणीमुळे या साहित्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे वाढत्या महागाईत जगायचे कसा प्रश्न नागरिकांना पडत आहे. शहरात पुन्हा 'चूल आणि बोळके' असे चित्र पाहायला मिळत असून, प्रशासनाने गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरत आहे. हॉटेल चालकांकडून लाकूड, कोळसा व इलेक्ट्रिकल शेगडीची मागणी वाढली आहे तर कोळशा शेगड्यांचा वापर वाढल्याने कोळशाचे दरही कडाडले आहेत. यामुळे यापुढील दिवसांत परस्थिती आटोक्यात न आल्यास हॉटेल व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

लाकूड, कोळशाला वाढली मागणी

गॅस मिळत नसल्याने नागरिकांनी जुन्या पद्धतीच्या चुली आणि शेगड्यांकडे धाव घेतली आहे. टिंबर मार्केट, मार्केट यार्ड, हडपसर, कात्रज, गुलटेकडी आदी भागासह उपनगरे आणि आयटी हब असलेल्या भागातील हॉटेल व्यावसायिकांना गॅस अभावी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर रॉकेलची उपलब्धता नसल्याने लाकूड पेटवण्यासाठी कापूर किंवा इतर ज्वलनशील साहित्याच्या विक्रीही तेजीत आली आहे.

काळ्या बाजाराने मिळणारा ५ हजारांचा गॅसही मिळेना ?

हॉटेल व्यावसायिक अडचणीत असल्याने काळ्या बाजाराने मिळणारा ५ हजारांचा गॅस सिलिंडरही मिळत नाही. यामुळे आजही व्यावसायिकांची तारांबळ उडाळी आहे. घरगुती गॅसचा छुपा वापर केला जात होता. आता घरगुती सिलिंडरदेखील वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक छोट्या खानावळी आणि हॉटेल व्यवसायिकांच्यावर कुन्हाड कोसळली आहे. काही ठिकाणी तर मेन्यूमध्ये कपात करण्याची वेळ आली आहे.

विजेचा वापर वाढला

नागरिक व लहान खानावळी लाकूड-सरपण, कोळसा आणि पारंपरिक शेगड्यांचा वापर सुरू करत आहेत. लाकूड-सरपणाची मागणी वाढल्याने काही बाजारपेठांमध्ये त्याचे दरही वाढले आहेत. तसेच इंडक्शन शेगड्या, इलेक्ट्रिक स्टोव्ह किंवा पेललेट स्टोव्हचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र विजेचा जास्त वापर व उपकरणांची उपलब्धता ही मोठी समस्या आहे.

व्यवसाय तर करावाच लागेल. नाहीतर गिऱ्हाईक तुटल्याने मोठा फटका बसेल. या भीतीने स्टोव्हवर व्यवसाय सुरू आहे. घराचा हप्ता आणि कर्ज असल्याने शहरात रॉकेल मिळत नाही म्हणून वाघोलीवरून रॉकेल आणले आहे. ४५० रुपयांचा स्टोव्हवर व्यवसाय सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी ८० रुपये होते, तर आता १२० प्रतिलिटर रॉकेल मिळाले. त्यामुळे या युद्धजन्य परिस्थितीचा लॉकडाऊनसारखा त्रास सहन करावा लागत आहे.- सिद्धार्थ साळुंके, स्वामी समर्थ वडेवाले, सदाशिव पेठ

सहकारनगर भागातील गॅस पुरवठा वितरण ऑफिसमध्ये सर्व्हर डाऊन आहे, तर मोबाइलवरून बुकिंग होत नसल्याने सिलिंडर मिळेल की नाही यांची चिंता कुटुंबाला सहन करावी लागली. यावर गॅसपुरवठा वितरणवाले अनेक कारणे देत आहेत. यामुळे अशा वितरकांवर कारवाई करावी.- मगेश शहाणे, सामाजिक कार्यकर्ते

पूर्वी लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. शहरात गॅसटंचाईमुळे आता परिस्थिती निर्माण झाल्याने लाकूड-सरपण, कोळशाला मागणी वाढली आहे. हॉटेल आणि स्नॅक्स सेंटर, खानावळ यांच्याकडून लाकडाला गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड मागणी आहे, तर दरात २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.- हरिश्चंद्र बिबवे, वखार व्यवसायिक, बिबवेवाडी

सध्या इलेक्ट्रिकल शेगडीची हॉटेल व्यावसायिकांकडून प्रचंड मागणी वाढली आहे. हॉटेलमध्ये मोठ्या इलेक्ट्रिकल शेगडीचा तुटवडा आहे, तर २५ ते ३० टक्के दरवाढ झाली आहे. तरीपण मिळत नसल्यामुळे ग्राहकांना माघारी जावे लागत आहे.- सिद्धार्थ कालेकर, इलेक्ट्रिकल विक्रेते

शहरातील मध्यवर्ती भागात सर्वाधिक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जाण्याची वेळ आली आहे. खानावळ व मेसवाल्यांकडून जादा पैशाची मागणी, तर वरण व भातावर दिवस काढण्याची वेळ आली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारने किमान शिवभोजन चालवणाऱ्यांना तरी व्यावसायिक गॅस पुरवठा करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिवभोजनाचा आस्वाद घेता येईल.- जितेंद्र टकले, सामाजिक कार्यकर्ते

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Faces Gas Shortage; Citizens Turn to Wood, Coal Stoves

Web Summary : Pune faces a gas cylinder shortage due to global conflicts, impacting hotels and citizens. Wood and coal demand surges, raising prices. Traditional cooking methods return as gas supplies dwindle, prompting calls for government intervention.
टॅग्स :PuneपुणेLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईIranइराणIsraelइस्रायलMONEYपैसाCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Crisisइंधन टंचाई