शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोगाबाबत जनजागृती करणारी ससून रूग्णालयाची शॉर्ट फिल्म ‘खो खो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 00:00 IST

खोकला आणि थुंकीद्वारे क्षयरोग बाधित रूग्ण दुस-याला खो च  देत असतो आणि यातूनच हा आजार पसरत जातो.

ठळक मुद्देलघुपटातून थुंकी आणि खोकल्याद्वारे दुस-याला खो देत आजार पसरविण्याचा खेळ थांबवा संदेश

- नम्रता फडणीस- पुणे : खो खो हा खेळ आठवून पाहा. एक व्यक्ती पळत असते आणि ती अचानक दुस-याला खो देते आणि मग खो मिळालेली व्यक्ती पळायला सुरूवात करते. हा खेळ असाच चालत राहातो. क्षयरोगासारख्या आजारामध्येही हे पाहायला मिळते. खोकला आणि थुंकीद्वारे क्षयरोग बाधित रूग्ण दुस-याला खो च  देत असतो आणि यातूनच हा आजार पसरत जातो. हा खो खोचा खेळ थांबवा अशा आवाहनाद्वारे समाजात जनजागृती करणारा  खो खो नावाचा अर्ध्या तासाचा लघुपट ससून रूग्णालयाच्या क्षयरोग विभागाने निर्मित केला आहे. विशेष म्हणजे, या लघुपटातील कलाकार आहेत विभागातलेच कर्मचारी आणि डॉक्टरमंडळी.शासनाने राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला असला तरी समाजात या गंभीर आजाराबाबत अद्यापही म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही. याबाबत ससून रूग्णालयाच्या क्षयरोग विभागाने  पुढाकार घेऊन या लघुपटाची निर्मिती केली आहे. जगभरातील विविध महोत्सवांमध्ये या लघुपटाचे कौतुक झाले आहे. नाट्यरूपांतरातून या गंभीर आजाराकडे जनमानसाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुटुंबातील सूनेला सातत्याने ताप आणि खोकला येत असतो. मात्र ती नाटक करत आहे असे तिच्या कुटुंबाला वाटते. तेव्हा शेजारची बाई कुटुंबाला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला देते. मात्र, मांत्रिकाकडून काही घडत नाही. मग डॉक्टरांकडे नेले जाते आणि ती बरी होते. अशा मांडणीतून समाजाचे प्रबोधन करण्यात आले असल्याची माहिती ससून रूग्णालयाचे क्षयरोग विभाग प्रमुख डॉ. संजय गायकवाड यांनी दिली. सोमवार दि. २५ मार्च रोजी बी जे मेडिकल कॉलेजच्या सभागृहात या लघुपटाचे सादरीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.----------------------------------------------------------------------------------------------या लघुपटातून थुंकी आणि खोकल्याद्वारे दुस-याला खो देत आजार पसरविण्याचा खेळ थांबवा असा संदेश देण्यात आला आहे. लवकरच या लघुपटाचे शाळा, महाविद्यालयांसह इतर ठिकाणी सादरीकरण केले जाणार आहे- डॉ. संजय गायकवाड, विभागप्रमुख, क्षयरोग ससून रूग्णालय----------------------------------------------------------------------------------------

 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यShort Filmsशॉर्ट फिल्मsasoon hospitalससून हॉस्पिटल